Home > News Update > 'वडाळा पोलीस ठाण्यातील दोषी पोलीसांना फाशी द्यावी'

'वडाळा पोलीस ठाण्यातील दोषी पोलीसांना फाशी द्यावी'

वडाळा पोलीस ठाण्यातील दोषी पोलीसांना फाशी द्यावी
X

वडाळा (Wadala) पोलीस (Police) स्टेशनमध्ये पोलिसांच्या कोठडीत एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी वडाळा टी टी पोलीस स्टेशनबाहेर निषेध व्यक्त करण्यासाठी जमलेल्या नागरिकांवर लाठीचार्ज करण्यात आला. जमावाकडुन दगडफेक केली असल्यामुळे लाठीचार्ज केल्याचं म्हटलं जात आहे.

पोलीस ठाण्यात विजय सिंह या सव्वीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर उत्तर प्रदेश भारतीय संघाने वडाळा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सांगळे यांची भेट घेऊन ३०२ कायद्याअंतर्गत दोषी पोलीसांवर कठोर कारवाई किंवा फाशी देण्याची मागणी केली आहे.

'लवकरात लवकर पोलीसांनी विजय सिंह यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा' असं निवेदन उत्तर प्रदेश भारतीय संघाने पोलीस अधिकारी सांगळे यांना लेखी स्वरूपात दिले आहे. जो पर्यंत मृत व्यक्ती विजय सिंह यांच्या कुटुंबीयांना पोलीस न्याय देत नाहीत. तो पर्यंत आम्ही हा लढा सुरू ठेवणार आहे अशी माहिती त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिली आहे.

Updated : 31 Oct 2019 5:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top