Home > मॅक्स व्हिडीओ > करोनाचं सावट; 'या' दिवशी चैत्यभूमीवर 'असं' चित्र कधीच दिसलं नाही

करोनाचं सावट; 'या' दिवशी चैत्यभूमीवर 'असं' चित्र कधीच दिसलं नाही

दर वर्षी मुंबईत शिवाजी पार्क आणि चैत्यभुमीवर ४,५ आणि ६ डिसेंबरला आंबेडकरी अनुयायांची संख्या अफाट असते. तीन दिवसात २०-२५लाखांचा जनसागर उसळतो. या वर्षी शासनाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या आवाहनानुसार आंबेडकरी अनुयायांनी चैत्यभूमीवर यायचे टाळून घरूनच बाबासाहेबांना अभिवादन केले. त्यामुळे दीक्षाभूमीवर 'असं' चित्र कधीच दिसलं नाही.....या तयारीचा चैत्यभुमीवरुन ग्राऊंड रिपोर्ट घेतला आहे मॅक्स महाराष्ट्राचे सिनीअर स्पेशल करोस्पॉन्डन्ट विजय गायकवाड यांनी.....

X

कोरोना महामारीच्या संकटात सुरूवातीला आंबेडकर जयंती, त्यानंतर बुद्ध जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि आता 6 डिसेंबर महापरीनिर्वाण दिन.. महामानवाला अभिप्रेत असणाऱ्या प्रगल्भ समाज निर्मितीच्या दिशेने वाटचाल होतेय याचं समाधान आहे असं जेजे हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवत कानिंदे म्हणाले. सरकारनं केलेल्या आवाहनाला जनतेचे प्रतिसाद दिला आहे. मी गेली १५ वर्षे या ठिकाणी येतो परंतू यंदा आंबेडकरी जनतेने परीपक्वतेचे दर्शन दिल्याचे डॉ. कानिंदे म्हणाले.

चैत्यभुमीवर गर्दी करु नये असे आवाहन केले आहे. इथे येणाऱ्या प्रत्येकाचं थर्मल स्क्रीनींग होतं. प्रवेशद्वारावर सॅनीटायझर ठेवले असून, सोशल डिस्टन्स ठेऊनच प्रवेश दिला जातोय असं समता सैनिक दलाचे कमांडन्ट प्रदीप कांबळे म्हणाले.

दरवर्षी विविध संस्थांच्या माध्यमातून शिवाजी पार्क मैदानावर स्टॉल्स उभे करुन आंबेडकरी जनतेला सेवासुविधा दिल्या जातात. यंदा संस्थांनी हा निधी चैत्यभुमीच्या विकासासाठी दिला आहे. युनिअन बॅँक एससीएसटी युनिअनच्या वतीने चैत्यभुमीमधे कार्पेट आणि परीसरात रेड कार्पेट उभारुन परीसरात जंबो छत्र्या उभारल्या आहेत असे युनिअन बॅंकेचे व्यवस्थापक हरीश तायडे यांनी सांगितले.


Updated : 6 Dec 2020 6:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top