Home > Top News > मोरासोबत फोटो काढा, घोड्यावर बसा... देशाची परिस्थिती सध्या बिकट: पृथ्वीराज चव्हाण

मोरासोबत फोटो काढा, घोड्यावर बसा... देशाची परिस्थिती सध्या बिकट: पृथ्वीराज चव्हाण

मोरासोबत फोटो काढा, घोड्यावर बसा... देशाची परिस्थिती सध्या बिकट: पृथ्वीराज चव्हाण
X

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फेसबुक वर पोस्ट लिहिली असून या पोस्ट मधून त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काय म्हटलंय पृथ्वीराज चव्हाण यांनी.. तुम्ही मोराबरोबर फोटो काढा, घोड्यावर बसा किंवा देवाची करणी म्हणा, देशाची परिस्थिती सध्या बिकट आहे हे खरं आहे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

काय म्हटलंय पृथ्वीराज चव्हाण यांनी... कोरोना, चीनसह अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केंद्र सरकार साफ अपयशी ठरले आहे. त्या सगळ्या अपयशाला झाकण्यासाठीच केंद्र सरकारने सहा महिने संसदेचे कामकाज बंद ठेवले. त्या सगळ्या अपयशांवर संसदेत चर्चा होऊ नये, हीच त्यामागची भूमिका होती.

केंद्र सरकारची स्थिती गोंधळल्यासारखी झाली आहे. तुम्ही मोराबरोबर फोटो काढा, घोड्यावर बसा किंवा देवाची करणी म्हणा. तुम्हाला सध्याची स्थिती सावरता आलेली नाही. सरकार म्हणून ज्या अपेक्षा होत्या. त्या पूर्ण करू शकलेले नाही. जगातील कोणत्याच देशाने कोरोनाला देवाची करणी म्हटलेले नाही.

केवळ आपल्याच सरकारने ते स्पष्ट केले आहे. चीन, कोरोनाची स्थिती व देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केंद्र सरकार अपयश ठरले असून हे अपयश लपविण्यासाठीच त्यांनी सहा महिने संसद बंद ठेवली.

Updated : 23 Sep 2020 2:11 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top