Home > मॅक्स व्हिडीओ > ट्राफिक हवालदाराला नेले बोनटवर, बेशिस्त कारचालकाचा 'कार'नामा

ट्राफिक हवालदाराला नेले बोनटवर, बेशिस्त कारचालकाचा 'कार'नामा

ट्राफिक हवालदाराला नेले बोनटवर, बेशिस्त कारचालकाचा कारनामा
X

नवी मुंबईतील खारघरमध्ये एका कारचालकाने एका ट्राफिक पोलिसाला चक्क बोनटवर अर्धा किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या कारचालकाने वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. पण नंतर पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्याने चकमा देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. एका पोलिस कर्मचाऱ्याने त्याच्या गाडीसमोर येऊन थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्या उद्दाम कारचालकाने सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत पोलीस हवालदार बोनटवर असलेल्या अवस्थेत गाडी चालवली. अखेर त्याला थांबवण्यात यश आले आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.


Updated : 2022-07-10T12:50:16+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top