राजेश टोपे जी मास्क न घालता कोरोनाला रोखता येतं का?

Courtesy:- Social Media

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार कष्ठ करत आहे. सध्या लॉकडाऊन संपला असला तरी कोरोनाचा धोका थांबलेला नाही. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना रोखण्यासाठी एका शाळेतील विद्यार्थ्यीनी सोबत कोरोनाच्या जनजागृतीसाठी एक जाहिरात शुट केली आहे.

सध्या ही जाहिरात सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. या व्हिडीओमध्ये राजेश टोपे या मुलीशी कोरोनाला रोखण्यासंदर्भात संवाद साधत आहेत. मात्र, सुरुवातीला मास्क घातलेल्या राजेश टोपे यांनी विद्यार्थ्यींनीशी संवाद साधताना मास्क काढलेला दिसतो. तसंच जाहिरातीतील मुलीचा व्हिडीओ शुट करताना टोपे यांच्याप्रमाणे तिच्या तोंडाचा मास्क देखील गळ्यात असल्याचं दिसून येतं….

टोपे यांनी हा व्हिडीओ ट्विटर वर ट्विट केला आहे.

सोशल डिस्टन्स पाळा…..कोरोनाला घाला आळा….सर्वांना मिळुन कोरोनावर मात करायची आहे. त्यासाठी सर्वांनी शासनाने केलेल्या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. विशेषत: लहान मुलांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. शाळकरी विद्यार्थींनीशी साधलेला संवाद..
असं ट्विट टोपे यांनी केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here