Home > मॅक्स व्हिडीओ > लव जिहादचा कायदा आणून भाजपला देशाचे पुन्हा विभाजन करायचे आहे : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

लव जिहादचा कायदा आणून भाजपला देशाचे पुन्हा विभाजन करायचे आहे : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

भाजप नेहमी ध्रुवीकरणाचे राजकारण करते. लव जिहाद कायदा आणून त्यांना देशाचे पुन्हा विभाजन करायचे आहे. अशा कायद्यांमुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊन विभाजन होण्याची भीती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

लव जिहादचा कायदा आणून भाजपला देशाचे पुन्हा विभाजन करायचे आहे : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
X

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, लव जिहादचा कायदा आणून भाजपला देशाचे पुन्हा विभाजन करायचे आहे असे सांगत भाजपवर निशाण साधला. बिहारमधील निवडणुकीवर बोलताना चव्हाण यांनी शंका व्यक्त केली. निवडणूक घासून झाली असून काय तरी घडलं असल्याची शंका येत आहे असे यावेळी ते म्हणाले.

लव जिहादचा कायदा आणून देशाचे पुन्हा विभाजन करायचे ही भाजपची भूमिका आहे. सुशांतसिंग राजपूत प्रकरण काहीतरी कारण सांगून दिल्लीच्या हातात घ्यायचं त्यामुळे न्याय मिळेल अशी आशा वाटत नसल्याचे चव्हाण म्हणाले. कोणाची चौकशी होणार नाही आणि सर्व गुंडाळून ठेवायचे आणि दहशतीसाठी याचा वापर करायचे चालू आहे. विरोधकांना टार्गेट केलं जातं आहे, आमिषे दाखवली गेली प्रताप सरनाईक यांच्यावर होणारी कारवाई ही पक्ष बघून आणि विरोधी पक्षाला मोडण्याकरिता कारवाई करत असल्याचे यावेळी सांगितले.

ज्या बँका इंदिरा गांधींनी राष्ट्रीकृत केल्या त्या मोठ्या उद्योगपतींना ताब्यात देऊन विक्री करण्याचे काम काम भाजप सरकारचे सुरू आहे अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

Updated : 25 Nov 2020 10:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top