अयोध्या ही साकेत नगरी होती का?

261

अयोध्येतील वादग्रस्त राम जन्मभूमीच्या जागेबाबत आता नवीन वाद निर्माण झाला आहे. बाबरी मशिदीच्या जागेवर बाबरी मस्जिद की, राममंदिर या मुद्द्याने देशाचं वातावरण गेल्या दशकात ढवळून निघालं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय़ानंतर या ठिकाणी आता येत्या 5 ऑगस्ट ला पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराचं भूमिपूजन करणार आहेत.

त्यापुर्वीच प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी नवा दावा केल्यानं वेगळाच वाद निर्माण झाला आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी जमिनीचे सपाटीकरण करताना आढळून आलेल्या प्राचीन मूर्ती व अवशेषांवरून ही बुद्धभूमी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आणि या ठिकाणी भव्य बुद्ध विहार बांधण्याची मागणी केली आहे.

हे ही वाचा…

मुंबईत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये बंद ठेवण्याचे आवाहन

ग्रामसभांना स्थगिती, गावचा कारभार ठप्प

आरक्षण – अर्थव्यवस्था – राज्यव्यवस्था आणि सर्व जातींचे आपण सगळे..!

जमीन सपाटीकरणात जे प्राचीन अवशेष सापडले ते सम्राट अशोकाच्या शासन काळातील आहेत. काही लोकांनी रामजन्मभूमी परिसराचे निष्पक्ष उत्खनन करण्यात यावे, अशी मागणी यूनेस्को या जागतिक पातळीवरील संघटनेकडे केली आहे.

अयोध्येतील अवशेषांवरून आता वेगवेगळे दावेही केले जात आहेत. आजची अयोध्या ही बुद्धांची प्राचीन साकेत नगरी आहे. गुप्त काळात साकेत नगरीचे नाव बदलून अयोध्या ठेवण्यात आले. त्यापूर्वी भारतात कुठेही अयोध्या नव्हती, असा दावा ज्येष्ठ विचारवंत दिलीप मंडल यांनी केला आहे.

तसंच काही जणांनी अयोध्येतील बुद्ध अवशेषांच्या आधारे न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने नक्की काय निर्णय दिला? इतिहास काय सांगतो? अयोध्या ही साकेत नगरी होती का? पाहा ज्येष्ठ इतिहासकार राम पुनियानी यांचं अभ्यासपूर्ण विश्लेषण

Comments