ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार काही वेळात थंडावेल....अनेकांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. पण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातल्या मेथवडे गावाने एक आदर्श निर्माण केला आहे. या गावच्या ग्रामपंचायतीचा कारभार इथल्या लोकांनी महिलांच्या हातात बिनविरोध दिला आहे. नऊ सदस्यांच्या या ग्रामपंचायतीमध्ये सर्वच्या सर्व महिला बिनविरोध निवडून आल्या आहेत.
विशेष म्हणजे या महिलांनी ग्रामपंचायतीचा कारभार हातात घेतल्यापासून पूर्णपणे दारूबंदी, महिला आणि तरुणांना रोजगार या तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले आहे. ग्रामस्थांनी सुद्धा या महिलांना लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
Updated : 13 Jan 2021 11:50 AM GMT
Next Story