Home > मॅक्स व्हिडीओ > मस्क यांच्या निर्णयाने ट्विटरच्या ब्लू टिक वाल्यांचे वाढले टेन्शन

मस्क यांच्या निर्णयाने ट्विटरच्या ब्लू टिक वाल्यांचे वाढले टेन्शन

एलन मस्क यांनी ट्वीटर ताब्यात घेतल्यानंतर एक मोठा निर्णय घेणार आहेत. त्यामुळे ब्लू टिक वाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

मस्क यांच्या निर्णयाने ट्विटरच्या ब्लू टिक वाल्यांचे वाढले टेन्शन
X

एलन मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर एक मोठा निर्णय घेणार आहेत. त्यामुळे ब्लू टिक वाल्यांचे धाबे दणाणले आहेत. एलन मस्क (Elon musk) यांनी ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर ट्विटरमध्ये मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच मस्क यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल (Twitter CEO parag agrawal), मुख्य वित्त अधिकारी नेड सेगल (Twiiter CFO NED segal), विजया गाड्डे (Vijaya gadde) यांच्यासह चार जणांची हकालपट्टी केली. त्यापाठोपाठ एलन मस्क यांनी ब्लू टिक वाल्यांचे टेन्शन वाढवणारा निर्णय घेतला आहे. एलन मस्क यांनी ट्विटरच्या ब्लू टिकसाठी 20 डॉलर प्रति महिना द्यावे लागणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ब्लू टिक वाल्यांमध्ये खळबळ उडाली आहे.


ट्विटरच्या ब्लू टिकसाठी पैसे मोजावे लागणार असतील तर ट्विटरचा पक्षी मुक्त कसा होईल? असा सवाल लेखिका कस्तुरी शंकर (kasturi shankar)यांनी केला आहे. कस्तुरी शंकर यांनी एलन मस्क यांनी ट्विटरच्या खरेदीनंतर ट्विटरचा पक्षी मुक्त झाला, असं ट्वीट केलं होतं. त्या ट्विटचा संदर्भ देत हे ट्वीट केले आहे.

ब्लू टीक असलेल्या पत्रकार करिष्मा असुदानी (Karishma asoodani)यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, तुम्ही तुमच्या ट्विटरवर असलेली ब्लू टीक कायम ठेवण्यासाठी महिन्याला 20 डॉलर (20$) म्हणजे 1600 रुपये द्यायला तयार आहात का? याबरोबरच आपण ट्विटरच्या ब्लू टिकसाठी पैसे देणार नसल्याचे नीलेश मिश्रा (Nilesh Mishra) यांनी म्हटले आहे. त्यामुळे एलन मस्क नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Updated : 1 Nov 2022 8:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top