Home > मॅक्स व्हिडीओ > International Youth Day: अडचणींवर मात करणारा युवा पत्रकार

International Youth Day: अडचणींवर मात करणारा युवा पत्रकार

International Youth Day: अडचणींवर मात करणारा युवा पत्रकार
X

युवा म्हटलं की नजरेसमोर असंख्य तरुण-तरुणी येत असतात. त्यांच्या कर्तृत्वाची बतावणी माध्यमं किंवा सोशल मीडियावर चर्चेच्या स्वरुपात झळकत असतात. मात्र, स्वत:च्या आयुष्यात नैसर्गिकरित्या आलेल्या अंधत्वावर मात करत जगाकडे स्वत:च्या अंतरंगातून पाहण्याची वेगळीच दृष्टी असणारा युवा पत्रकार गौरव मालक सध्या महाराष्ट्रभर लोकांचे प्रश्न मांडतोय.

गौरव मालक मॅक्समहाराष्ट्रमध्ये एक पत्रकार म्हणून काम करतो. स्वत:च्या जीवनातील अंधार विसरून गोरगरीब, शोषित जनतेचे प्रश्न मांडून त्यांच्या आयुष्य प्रकाशमान करण्यासाठी गौरव सातत्याने प्रयत्नशील आहे.

International Youth day च्या निमित्तानं गौरव मालक यांनी युवा असण्याची आगळी वेगळी व्याख्या समाजाला सांगितली आहे... नक्की पाहा वंचित शोषित समाजाच्या समस्या मांडणारा गौरव मालक यांची युवा असण्याची व्याख्या...

Updated : 12 Aug 2021 1:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top