निवडणुका आल्या की गोडगोड बोलणारे आणि हात जोडलेले नेते आपल्याला भेटतात आणि दिसतात... पण दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही तर पुढच्या निवडणुकीत काय होऊ शकते याचे ट्रेलर दाखवणाऱा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात एका उमेदवाराला एका संतप्त महिला उमेदवारा रुद्रावतार पाहायला मिळाला.....जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील कंडारी गावात मतं मागण्यासाठी आलेल्या उमेदवाराला महिलेने काम झाली नसल्याबद्दल फायलावर घेतल्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे.
Updated : 12 Jan 2021 3:20 PM GMT
Next Story