Home > मॅक्स व्हिडीओ > Valentines Day Special : दृष्टीहीन पती आणि डोळस पत्नीच्या अनोख्या समर्पणाची कहाणी

Valentines Day Special : दृष्टीहीन पती आणि डोळस पत्नीच्या अनोख्या समर्पणाची कहाणी

Valentines Day Special : दृष्टीहीन पती आणि डोळस पत्नीच्या अनोख्या समर्पणाची कहाणी
X

प्रेमाला कशाचीही मर्यादा नसते हे आपण अनेकदा ऐकलं असेल. अशीच प्रत्येकाच्या काळजाचा वेध घेणारी प्रेम कहाणी आहे पुण्याच्या दृष्टीहीन मात्र आपल्या कुशाग्र बुद्धीने डोळस असलेल्या राहुल देशमुख या तरुणाची... राहुल दृष्टीबाधित आहेत मात्र आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. राहुल Bank of India मध्ये अधिकारी म्हणून काम करतात, त्यांच्याशी प्रेमविवाह करण्याचा निर्णय़ त्यांच्या डोळस प्रेयसीने घेतला, या निर्णयाला विरोध झाला, पण त्यातूनही त्यांनी आपले प्रेम विवाहात रुपांतरीत केलेच....दिव्यांग विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत यासाठी या दाम्पत्याने आता पूर्णवेळ समाजकार्य सुरू केले आहे. अशा या सुंदर प्रेम युगुलाशी Valentine Day च्या निमित्ताने बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी.


Updated : 14 Feb 2022 12:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top