Home > मॅक्स व्हिडीओ > इच्छा तिथे मार्ग ! वयाच्या ७५व्या वर्षी पदवी परीक्षा पास

इच्छा तिथे मार्ग ! वयाच्या ७५व्या वर्षी पदवी परीक्षा पास

इच्छा तिथे मार्ग ! वयाच्या ७५व्या वर्षी पदवी परीक्षा पास
X

इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर कोणत्याही वयात एखादी व्यक्ती आपले ध्येय साध्य करु शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवले आहे ७५ वर्षांच्या राजकुमार तालमोघे यांनी.... आर्थिक परिस्थिती नसल्याने दहावीनंतर शिक्षणाची आवड असूनही शिकता आले नाही, त्यानंतर एसटीमध्ये नोकरी, कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे त्यांना आपले पदवी मिळवण्याचे स्वप्न बाजूल ठेवावे लागले होते. पण लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत तालमोघे यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवी मिळवली आहे. तालमोघे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी...


Updated : 17 March 2022 11:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top