Home > मॅक्स व्हिडीओ > नवी मुंबईतील भाजपचे नऊ नगरसेवक राष्ट्रवादीत जाणार?

नवी मुंबईतील भाजपचे नऊ नगरसेवक राष्ट्रवादीत जाणार?

नवी मुंबईतील भाजपचे नऊ नगरसेवक राष्ट्रवादीत जाणार?
X

गणेश नाईक समर्थक असलेले भाजपाचे 9 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याने यावरून भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईकांना टोला लगावलाय. स्वतःच्या लाभासाठी भाजपात आलेले आयाराम आता पुन्हा आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात जात असल्याची टीका मंदा म्हात्रे यांनी केलेय. आता पर्यंत भाजपात आलेले 12 पेक्षा अधिक आयाराम गेले असून उर्वरितदेखील जातील मात्र भाजपाचे पूर्वी 6 नगरसेवक होते ते सर्व भाजपात असून कट्टर भाजपा नगरसेवक व कार्यकर्ते पक्ष सोडत नाहीत. स्वार्थासाठी आपल्या नेत्यांसोबत आलेले नगरसेवक स्वार्थ साध्य न झाल्याने जात असल्याचा टोला आमदार मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईकांना लगावलाय.

Updated : 2022-02-16T20:02:58+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top