Home > Top News > लॉकडाऊनशी लढा : नाट्यसंस्थांची प्रीमियर लिग

लॉकडाऊनशी लढा : नाट्यसंस्थांची प्रीमियर लिग

लॉकडाऊनशी लढा : नाट्यसंस्थांची प्रीमियर लिग
X

लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय अडचणीत आले आहेत, पहिले तीन महिने सामाजिक संस्था, राजकीय कार्यकर्ते आणि देवस्थानांनी लोकांना जीवनावश्यक वस्तू काही प्रमाणात पुरवल्या. मात्र आता सहा महिने झाले आणि सगळ्यांच्या मर्यादा संपल्या आहेत. त्यात थिएटर बंद असल्याने नाट्य कलावंतांचा रोजगार बंद आहे, मात्र गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हणतात.

यातूनच प्रायोगिक रंगभूमीवर काम करण्याऱ्या ४ संस्था कलांश, प्रयोग, परिवर्तन आणि अभिनय ह्या मुंबई, ठाणे, जळगाव आणि रत्नागिरी येथील संस्थानी थिएटर प्रीमियर लीग सुरू केली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर या मालिकेत अभिनय करणारे अभिजीत झुंझारराव दशक्रिया आणि बंदीशाळा सिनेमात काम केलेले राहुल शिरसाट यांनी यात पुढाकार घेतला आहे. त्यांची भूमिका जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी किरण सोनवणे यांनी....

Updated : 10 Sep 2020 10:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top