Home > मॅक्स व्हिडीओ > #गावगाड्याचे_विलेक्शन : ग्रामपंचायतींमध्ये महिला कर्मचारी फक्त 1 टक्का

#गावगाड्याचे_विलेक्शन : ग्रामपंचायतींमध्ये महिला कर्मचारी फक्त 1 टक्का

#गावगाड्याचे_विलेक्शन : ग्रामपंचायतींमध्ये महिला कर्मचारी फक्त 1 टक्का
X

महाराष्ट्रात 28 हजार ग्रामपंचायतींमध्ये 1 लाख 35 हजार कर्मचारी काम करतात. पण यात महिलांची संख्या केवळ 1 टक्के आहे. महिला नेतृत्व आणि पुढाकार याकरिता कलेक्टिव्ह इंमपॅक्ट पार्टनरशीप ही संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करते. या संस्थेनं केलेल्या अभ्यासामधून राज्यातल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची संख्या, वर्गवारी, वेतन, सेवा, सुविधा याबाबत बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत.

सरकारकडे याबाबत पाठपुरावा केल्यावर कुशल, अकुशल आणि अर्धकुशल अशा सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी निश्चित करण्यात आली आहे. त्यांचे सर्व वेतन आता शासनच देतं आणि तेही त्यांच्या बँक खात्यात जमा होतं. या अभ्यासामुळं कर्मचाऱ्यांना त्यांचे हक्क मिळण्यात मोठी मदत झाली. सीआयपीकरता परभणीच्या नंदा गायकवाड यांनी राज्याच्या पाचही विभागातल्या 100 गावांमध्ये गेली दोन वर्ष हा अभ्यास केला. त्यांच्याशी बातचीत केली आहे पत्रकार साधना तिप्पनाकजे यांनी

Updated : 27 Jan 2021 3:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top