“क्रिकेट सेंटरमध्ये प्रशासनाचा खो-खोचा सराव’’
X
‘जगी हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा’ या सुरांनी आरंभ करू. मंडळाच्या ‘अशी ही बनवाबनवी’ अध्यायांतर्गत आपणावर संपूर्ण निद्रादेवी प्रसन्न झाल्याने प्राप्त झालेली साखरझोप, ज्यात स्वप्नांनाही शिरकाव करणे अशक्य, सोबत घोरण्याची प्रक्रिया चालू असल्याने झोपमोड कोणाकडूनही होऊ नये याची जणूकाही अप्रत्यक्षात घेतली गेलेली स्वत:ची काळजीच व घेणारा-येणारा आवाज म्हणजे इतरांना न उठविण्याचा संदेश अथवा ताकीदच. झोप अथवा विश्रांती घेण्याचे प्रकार वेळकाळ हे प्रत्येकजण आपली आवड व सोईनुसार ठरवून आनंद घेतो. काहींचा तर चक्क छंदच असतो.
आमच्यासारखे जागेपणी बेसावध असताना व जेवणानंतरची शतपावली अर्थात पाय मोकळे करीत असताना एक सनसनाटी क्रिकेट विश्वातील रसिकांसाठी तर धक्कादायकच! बातमी भारतीय क्रिकेट मंडळाने जाहीर करून न झोपलेल्यांची तर झोपच उडवून टाकली व विचारांचे चक्र फिरविण्यास भाग पाडले.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली राग ‘हादरा’ तसेच ‘घबराट’ मिश्रीत करून आपल्या पहाडी तसेच आक्रमक गर्जनेत ‘जिंकू किंवा मरू -शास्त्रीच्या नियुक्तीसाठी युद्ध माझे सुरू’ हे गात अमेरिकेस निघून गेला व सफेद निशाण शास्त्रीच्या हाती देऊन गाणे पूर्ण करण्यास सांगितले असेल. या दोघांच्या भागीदारी करारामधून पडद्यामागे काही तासातच, 1) रवि शास्त्रीची भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून 2019 च्या ‘वर्ल्ड कप’ इंग्लंड दौऱ्यापर्यंत नियुक्ती करण्यात आली. 2) भारतीय संघ जेव्हा परदेशी दौरा करेल तेव्हा सध्या भारतीय ‘अ’ संघाचा प्रशिक्षक राहुल द्रवीड हा फलंदाजासाठीचा प्रशिक्षक असेल तर झहीर खान सर्व गोलंदाजांचा प्रशिक्षक असेल. खात्रीचे उत्तर तर बुद्धिबळातूनच.
ही बातमी रात्रीच्या अंधारातली. वेळही दृष्कृत्यांची तीच. आमची बंडल मंडळाच्या अकार्यक्षमतेची पावती म्हणजे ही कृती. यातून अनेक चुकीचे संदेश जगभर गेलेले आहेत. यात कुणाचेही दुमत नसेल. मंडळास आर्थिक व्यवहाराव्यतिरिक्त कुणाचेही सुवेर-सुतक लागत नाही, हेच खरे. माहितीतील सत्यता-खात्री-हमी अर्थात जबाबदारीचा अभाव म्हणजेच अंधारातील गोळीबार. ही स्फोटक बातमी मंडळाच्या कोणत्या अधिकाऱ्याने कुणास व कधी- कशी- कुठे दिली याचा खुलासा आजवर केला गेलेला नाही. एरव्ही बातमीचा कीस कीढणारे- पाडणारे सत्यता पडताळून वेध घेणारे- वाहिन्यांच्या कलाकारांनी- या प्रकरणात मात्र मौनव्रत धारण केलेले आहे. वाहिन्या नेहमीच, ‘माहिती सूत्रांकडून मिळाली’ असे कबूल करून बातमी देतात. यांच्या सूत्रांचाच मंडळाने शस्त्र-अस्त्र म्हणून वापर केलेला आहे असा भास होतो.
मंडळ - वाहिन्यांचे सलोख्याचे संबंध प्रस्थापित केलेलेच असतात, यातील निवडकांचे ‘लागेबांधे’ सदराखाली येतात. अशाच मंडळांच्या हितचिंतकांनी, शुभेचछुकांनी केवळ बातमी देऊन मोकळीक साधली. इतरांनी विजयास महत्त्व न देता बघ्याची भूमिका पसंत केलेली आहे. क्रीडा रसिकांचा विचार कोण कधी करणार! प्रादेशिक वाहिन्यांनी तर खेळास महत्त्व देण्याचेच बंद केलेले आहे. खेळाचे तसेच खेळाडूचे दैव बलवत्तर असल्यास ती बातमी होते. खेळापेक्षा खून, दरोडे, लूटमार, बलात्कार, आग, आत्महत्या हे विषय वाहिन्यांना आपलेसे करण्याजोगे अथवा ते जास्त जवळचे वाटतात. यांच्यातही आपापसात शर्यत सुरूच असते. कुरघोडीची कल्पना एक रसिक म्हणून सहज येते. कार्यक्रमाचा वेळ, विषय हे साक्ष देतात.
असे असूनही अभिमानाने कार्यक्रमाच्या अंती तुम्हा आम्हास उपदेश करतात की ‘राहा एक पाऊल पुढे ’ तर दुसरा म्हणतो, ‘देश को रखे आगे ’ तिसऱ्याचे ब्रिदवाक्य ‘देधडक-बेधडक’ चौथा चष्म्यातील काणा डोळा खेकसतो की, ‘थेट- अचूक- बिनधास्त ’ अशी अनेक हिरे-माणकं आहेत. कोणाची निवड करावी...? दृष्कृत्ये वर कथित केलेली आहेत. मुलेबाळे सोबत असताना हे प्रसंग – दृष्ये जेव्हा प्रत्यक्ष त्यांच्या दृष्टीस आमच्यासोबत पडतात तेव्हा त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना कोणत्या प्रकारे उत्तरे द्यावीत... याचे मार्गदर्शन होऊ शकेल का? जो बोलाची कढी व बोलाचा भात या प्रकारातला नसेल. काही मिनिटांच्या अवधीतच शंभर-दोनशे बातम्यांचे मीटर सांभाळणाऱ्या वाहिन्यांनाही मंडळाच्या गलथान कारभाराची अॅलर्जी आली आहे का?
‘वाहिन्यांची कमाल व मंडळाची धमाल’ या करूण कहाणीनंतर बंडल मंडळाचा ‘संशयकल्लोळ’ या प्रथम पेश होणाऱ्या नाटकाच्या शॉर्ट फिल्मप्रमाणे अंक त्यांची वेळ तसेच बदल करण्याचे सर्वाधिकार मंडळाने स्वत:कडेच ठेवले. यानंतर मंडळाने ‘बेबंदशाही’ ‘वस्त्रहरण क्रिकेटचे’ यातून प्रतिसाद ते प्रतिकाराचा अंदाज घेऊन ‘धूमशान’ अशी नाटकांची मालिका आम्ही सुरू करीत असून, यातून मंडळाने खास या सदराखाली नियुक्त करण्यात आलेले मर्यादित अधिकारी त्यांचे व्यक्तिमत्व समाजातील प्रतिष्ठा, शैक्षणिक पात्रता, कार्याचा अनुभव, मंडळाच्या ’चांगभल्यासाठीच्या योजना’, यापुढे करण्यात येणारा पारदर्शक कारभार, स्वच्छ प्रशासन, शेवटच्या अंकात आर्थिक व्यवहारावर धार-गिधाड या दोघांसारखी तीक्ष्ण तसेच धारदार नजर आपल्या नजरेस येईल अशी घोषणा व जाहीरातींचा एकगीत योग अर्थात ‘टूइनवन’ साधला, तो दिवस होता ‘गुरुपौर्णिमे’चा अस्त व अमावस्येच्या पंधरवड्याचा तसेच आठवड्याचा आरंभ. प्रतिपदा सोमवार 10 जुलै 2017. स्थळ अर्थात मुंबईतील क्रिकेट सेंटर जे दालमियांच्या काळात स्थलांतर होता होता वाचले. प्रथमदर्शनी बाहेरून भेट झाल्यावर आपण नक्कीच ‘रूप तेरा मस्ताना क्रिकेट का प्यार है मेरा दिवाना’ गुणगुणत आतून फेरफटका मारत असताना आपणांस सुगंध व दुर्गंध या दोघांचाही अनुभव येईल.
सुगंध येईल तो आजी-माजी क्रिकेटवीरांचा... जे एक से दो भले दो से भले चार /मंझील अपनी दूर है रस्ता करना पार या तोडीचे देशाचे प्रतिनिधित्व करणे, तेही नि:स्वार्थीपणाने, निर्भिडतेने. क्रिकेटच त्यांचे ध्येय-ध्यास व श्वास होता. आर्थिक धनप्राप्ती-लाभ त्यांच्या मनाला कधीच शिवले नाही. त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन त्यांच्या निवृत्तीनंतर मंडळाने खेळाडूच्या नावाने एखादा गौरवार्थ सामन्याचे आयोजन करून त्यातून झालेली कमाईची थैली देऊन सन्मान करणे यात सार्थकता मानली जात असे. आपली खेळाची आवड तसेच प्रेम-देशसेवा खेळ जिवंत राहून प्रेक्षकवर्गाला आनंद देण्याची मनोकामना व यासाठी सोई सुख सुविधांवरही तीलांजली देऊन स्वत:च्या घरांचा तबला वाजवून घेऊन केलेला जमिनीवरील आयुष्यभरातील प्रवास. तेही हसत खेळत हातात तिरंगा घेऊन देव देश अन् क्रिकेटपायी बॅट घेतली हाती... असे म्हणत. अर्थात हे युद्धात्मे योगीच होते. यांचे फोटो मंडळाने कदाचित पाहणाऱ्यांना खुश करण्यासाठी किंवा आपल्या जाहीरात बाजीसाठी लावलेले असावेत. ह्यांचे दर्शन घेऊन सुगंध दरवळल्याचा अनुभव येतो. आमच्या कार्याची नोंद घ्या, हे केवळ दर्शविण्यासाठी.
आपण जसजसे या इमारतीचे जिने चढीत मार्गस्थ होतात तसतसा सहन न होणारा दुर्गंध आपल्या नाकात जाऊन सुरक्षाकवच भेदून केसांचे भस्म करतो व भोगीरामांचे स्मरण करण्यास भाग पाडतो. अशा वेळेस आपल्या मुखातून जर मानसीच्या चित्रपटावर तुझे निरंतर चित्र पाहतो, हे बोल जरी निघाले तर फोटोतील क्रिकेटयोगी पूर्वीच्या क्रिकेटपंढरीची कथा व आता केलेल्या स्मशान भूमीची व्यथा आपणास कथित करतात.
ही उभी असलेली वास्तू म्हणजे खेळाच्या प्रशासनाचे प्रतीक. भारतीय क्रिकेट मंडळाचे मुख्यालय खेळ खेळाडूंसाठी तर पवित्र मंदिर नाव क्रिकेट सेंटर यात नावातील मध्यबिंदूच गायब झाल्यास राहिले काय? सेंटर मध्ये पवित्र्यता शोधूनही सापडणार नाही. मानवी बुद्धीने न हरणाऱ्या शक्तींचा वावर संचार या इमारतीत आहे असा सततचा भास भेट देणाऱ्यांना होतो. कळत नकळत शौकिन पाहुणे त्यांची इमारत सफर पूर्ण झाल्यावर म्हणतात किंवा तसे उद्गार त्यांचा तोंडून निघतात की खेळ खेळाडूंचे दफन-दहन केंद्र आहे का? यास जबाबदार कोण? माणूस आजारी झाल्यास त्यासाठी वैद्यकीय उपचार केंद्रात डॉक्टरांकडून त्याचे निदान होऊन औषधोपचारांद्वारे तो बरा होऊ शकतो, तर मग आमच्या आपल्या क्रिकेटला तसेच ते चालविणाऱ्यांना कोणत्या न बरा होणाऱ्या शारिरीक- मानसिक आजाराने ग्रासले आहे हे त्यांना कळू शकेल का? याचा शोध घेतल्यास ते उत्सुक आहेत. त्यांची भ्रमंतीही सुरू झाली आहे. असे केवळ ऐकू येणाऱ्यांनाच सांगतात की सब कुछ सीखा हमने ना सिखी होशीयारी सच है दुनियावालो के हम है अनाडी! वास्तूचा निरोप घेताना संदेशरूपी संबंधितांना आवाहन करतात क्रिकेट बढाओ देश को बचाओ.
अर्थात या नाऱ्याचा भविष्यकाळात वापर झाल्यास काही अंशी तरी फरक पडेल. वास्तूतील क्रिकेट योगी हातचे काहीही न राखता भले बुरे यांची आजपर्यंतची कहाणी काटछाट शाब्दिक बदल न करता सांगून मोकळे होतात व प्रात्यक्षिक अनुभव घेण्याचा प्रामाणिक सल्ला देतात. घाईतही थोडा वेळ लागतोच. कृपया थांबा- पहा -खात्री करून मगच ओलांडा- सामना नको त्यांच्याशी आहे याचे भान ठेवा- असे मायेने सांगतात शेवटी पुन्हा एकदा फिर कब मिलोगे ची विचारणा करून विनम्रतेने हात जोडतात. ‘क्रिकेटची तिमोटी प्राप्त झाल्या चाब्या - आत आहे मेवा उघड दार देवा आता उघड दार देवा - मागोवा घेतला असता असे आढळून आले की मुळात क्रिकेटलाच हेतूपुरस्सर बदनाम करण्यात आलेले आहे. दुजोऱ्यात खेळाडू स्वत: मॅच फिक्सींग, स्पॉट फिक्सिंग, बेटींगमध्ये पकडले गेल्याने ते स्वत:सोबत खेळ –संघ-स्पर्धा-आयोजक ते मंडळ देशाच्या जनतेच्या नजरेत गुन्हेगार तसेच आरोपी - आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार बेटिंग या जुगाराच्या प्रकारास मान्यता मिळणार आहे. दुधात साखर.
खेळाचे शुभचिंतक चाहते खेळाडूंचे हित, भले करणारे, जपणारे नाण्याच्या दुसऱ्या बाजूस खेळाडूला पैशाचा मोह, भुरळ तसेच प्रोत्साहन देणारे उद्योगपती त्यांना आपल्या संघात खेळण्यासाठी करोडोंचे मायामाळ यासाठी जाळ्यात पकडणारे त्यांचे सल्लागार आर्थिक व्यवहारात कोळी गोटी किमया दाखवणारे जादुगार हम भी कुछ कम नही व सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी लक्ष्मी योग मला मिळावा या संतवाणीचा वापर करून अनुक्रमे खासदार विजय माल्या किंगफिशर राम कुंदर अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा भागीदार राजस्थान रॉयल्स सोबत फरार घोषित –ललित मोदी (इंग्लंड) भ्रष्टाचार मनी लॉनडरिंग -फसवणूक - राजस्थान क्रिकेट असोसिएशन सिनेस्टार शाहरुख खान ज्याने दारू पिऊन स्वत:चा आदर्श अवतार कोवळ्या अल्पवयीन मुलांसमोर ठेवून त्याचाच संघाचा सामना मुंबईचा वानखेडे स्टेडीयमवर चालू असताना आपल्या हाताचा विशेष बोनस सिक्युरिटी गार्डला देऊन मैदान गाजवले. या मंडळींनी दुकान थाटून क्रिकेटला नामोहरम केले. तर महानगर पालिकेने कै. दादा कोंडकेंच्या बोट लावीन तेथे गुदगुल्या या सिनेमाप्रमाणे, पाऊल पडेल तेथे खड्डा म्हटले... हा खड्डा गाडण्यासाठी तसेच दफनांसाठीही उपयुक्त - अगदी हमीसहीत.
शाळकरी मुलांना भूमिती शिकण्यासाठी हव्या त्या आकारात बसून अगदी झोपून अभ्यास करण्यासाठीही. भरीत भर म्हणून ‘करून दाखवलं’चे निशाण रोवण्यासाठी तसेच भुलभुलैय्याचा जाहिरातबाजी तसेच भूलथापांच्या श्रेयासाठी क्रिकेटची सुटका नाही. बॉम्बे डाईंग नावाप्रमाणे त्याच कंपनीचे मालक नसली वाडियांसोबत अभिनेत्री प्रिती झिंटा यांचे वादविवाद- तंटे - सामन्यासोबत याचेही प्रदर्शन. अगदी पोलीस तक्रारीपर्यंत. अंतिम विभागात नियामक मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवासन यांचा जावई. याने सामने सुरू होण्यापूर्वीच हवामानासहित ते सामन्याच्या निर्णयापर्यंत - पूर्वीच केलेली भविष्यवाणी. त्यातून देण्यात आलेले आर्थिक व्यवहारासाठीचे संदेश हेच आहे. संशय कल्लोळ, बेबंदशाहीचे नाटक व त्यांचे अंक याच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मुख्यालयातून अर्थात जगप्रसिद्ध वैभवप्राप्त ऐतिहासिक वास्तूतून ज्याचे नाव, त्याची ओळख क्रिकेट सेंटर, परंतु मध्ये बिंदूच यापूर्वी घेतलेल्या मद्यभागांनी छेदूनच टाकलेले आहे.
षटकातील शेवटचा चेंडू नियामक मंडळाचेच पूर्वीचे आर्थिक पुरस्कर्ते श्री सुब्रतो रॉय सहारा यांनी मंडळास वाईड-नोबॉल बंपर टाकून जायबंदी केले. राखीव यादीतील शेयर मार्केटलाही बुडविले व सर्वांनाच बेसहारा केले. येथे अंक स्वल्प विरामापर्यंत आलेला आहे. ‘भोली सुरत दिल के खोटे नाम बडे और दर्शन खोटे’ हेच खरे. पूर्ण विरामाकडे वाटचाल करीत असताना नवल वाटते ते कालखंडाचे. त्रिवेदी-चतुर्वेदी यांच्या कुबड्यांचा आधार घेऊन याच वास्तूच्या भमत्यांवर इंडियन प्रीमियर लीग अर्थात आय.पी.एल या स्पर्धा आयोजनाचा कार्यमहाल आहे. शंका-कुशंका यांचे कधीही समाधान होऊ शकणार नाही. बहुचर्चित भानामती-शाबरी अशा अघोरी विद्या जर अस्तित्वात असतील तर ही वास्तू याचे माहेरघरच आहे. चमत्कार आपण रोजच्या अर्धवटकर वाहिन्यांमार्फत याच अवस्थेत ग्रहण करीत असतो. विध्वंस काही भोगीराम, जिवंत परंतु मृतावस्थेत मुक्तसंचार त्याच पद्धतीत- आंधळा कारभार, सर्वगुण संपन्नांची वस्ती तर गैरव्यवहारात अग्रस्थानी. विनाशाचे वेळापत्रक आखणी आराखडे अंमलबजावणी या सर्व कर्मांची ही वास्तू साक्षीदारच. पुरावे कदाचित शक्य होणार नाहीत. माहितीच्या अधिकारात कुणाला काही हाती लागलेले आहे का? अकार्यक्षम प्रशासकीयांचा हातात क्रिकेटसत्ता होती. आजही आहे. क्रिकेटचे भले मात्र भगवान भरोसे...
‘जब दिल ही टूट गया अब मौके क्या करेंगे...’ अशी खेळाची अवस्था.
तसे पाहता लक्ष्मीची अनेक रूपे आहेत व ती आहे भगवान श्रीविष्णुची. ती कोणा कोणाची होऊ शकते? आपणा सर्वांनाच ती हवीहवीशी वाटते यासाठीच अस्थिर-चंचल - अशा नाना प्रकारच्या रूपांत ती तुमच्या आमच्याशी नाते जोडून वास्तव्यही करते. तुमच्या वर्तनाने तिचे निर्णय ठरतात परंतु हे सर्व ती करीत असताना श्री भगवान विष्णुंनी ते सर्व सहन करून लाल झेंडा घेऊन संपावर जावे का? किंवा लक्ष्मीनारायण रूपी त्यांच्या कृपेचा सदासर्वदाचा आशीर्वाद देऊन, सोबत असल्याची जाणीव करून द्यावी. आईवडिलांना दोघांना नमस्कार करणे ही उचित कृती. कुणा एकास केल्यास ते पावन होत नाही. आपले नियामक मंडळ मात्र त्यास अपवाद आहे. आणखी न मिळाल्यासही चालू शकते, अशा परिस्थितीत आपले मंडळ आहे.