Home > मॅक्स स्पोर्ट्स > १० किलोपेक्षा जास्त प्लास्टिक असेल तर मनपा देणार व्हीआयपी ट्रिटमेंट…

१० किलोपेक्षा जास्त प्लास्टिक असेल तर मनपा देणार व्हीआयपी ट्रिटमेंट…

१० किलोपेक्षा जास्त प्लास्टिक असेल तर मनपा देणार व्हीआयपी ट्रिटमेंट…
X

आज पासून (२३ जून) प्लास्टिकच्या वापरावर बंदी आली आहे. मात्र तुमच्याजवळ असणाऱ्या प्लास्टिकचे काय? याचा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. मात्र मुंबईकरांना घाबरु नका. महानगरपालिकेने तुमच्याकडे असणाऱ्या प्लास्टिकच्या संकलनाची सोय केली आहे. जर तुमच्याकडे १० किलोपेक्षा जास्त प्लास्टिक असेल तर नोटाबंदी प्रमाणे तुमचे हाल होणार नाहीत. याउलट महानगरपालिकेने तुम्हाला व्हिआयपी ट्रिटमेंन्ट देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी फक्त तुम्हाला महानगरपालिकेत फोन करण्याची गरज आहे. महानगरपालिका त्यासाठी गाडी पाठवणार आहे. तसंच तुमच्याकडे १० किलोपेक्षा कमी प्लास्टिक असेल तर मुंबई महानगरपालिकेने विविध ठिकाणी प्लास्टिक संकलन केंद्रदेखील सुरु केले आहे.

कुठे करणार संकलन?

 • सिंधी सोसायटीचे हेलिपॅड, काला रोडचा शेवटचा भाग, चेंबूर शेड १
 • सिंधी सोसायटीचे हेलिपॅड, काला रोडचा शेवटचा भाग, चेंबूर शेड २
 • एमसीजीएम अॅनिमिटी प्लॉट, सिकोचा कंपाऊंडजवळ, घाटकोपर (प.)
 • लेक रोड, हिंद रेक्टीफायर, भांडूप
 • फ्लाय ओव्हर ब्रीज खाली, व्ही. बी. फडके रोड, मुलुंड (प)
 • नंदनवन औद्योगिक परिसर, मालवीय रोडच्या विरुद्ध बाजूला, मुलुंड (प)

 • सुरक्षा गार्डन, कफ परेड, कुलाबा
 • टाटा पॉवर सेंटर समोर, संत तुकाराम रोड, मुंबईचं शेवटचं टोक.
 • नंदलाल जानी रोड, एस. व्ही रोड, खालची बाजू
 • कुंभारवाडा, नॉर्थ बुक, ज्युईश कबरस्तान, एम. एस. अली रोड, दुर्गादेवी उद्यानाजवळ
 • बॉम्बे गॅरेज, बाबुलनाथ
 • घास गल्ली, सानेगुरुजी मार्ग, आग्रीपाडा
 • दीनशा पेटीट लेन, लालबा
 • कॉटनग्रीन रेल्वेस्टेशन तिकीट काऊंटर खाली, कॉटन ग्रीन
 • टी. बी. हॉस्पिटलजवळ, जेरबाई वाडिया मार्ग
 • आर. जी. प्लॉट, सी- १७, बस डेपो मार्ग, शेख मिस्त्री दर्गा, अँटॉप हिल
 • फायर ब्रिगेडजवळ
 • एल. जी. पी यार्ड, इंजिनियरिंग हब प्रिमायसेसजवळ, डॉ. ई. मोझेस रोड, वरळी
 • धारावी पंपिंग, धारावी

 • प्रमोद महाजन गार्डन, दादर
 • कचराकुंडी नंबर – २, भारतनगरच्या कोपऱ्याजवळ, बीकेसी
 • वांद्रे एम. टी. एन. एल टेलिफोन एक्स्चेंजजवळ, वांद्रे (पश्चिम)
 • टी. पी. एस रोड क्रमांक ३, धर्मवीर संभाजी ग्राऊंड, कोटवाडी, सांताक्रूझ (प)
 • चेकपोस्ट चौकीजवळ, महाकाली रोड, फुटपाथ
 • कपासवाडी, वर्सोवा लिंक रोड, अंधेरी (प.)
 • अजित ग्लास, जोगेश्वरी (प.)
 • यशराज, वीरा देसाई रोड
 • इको हाऊसजवळ, विश्वेश्वर क्रॉस रोड, गोरेगाव (पूर्व)
 • एस. व्ही. रोडचे रेलिगेअर, महेश नगरसमोर, गोरेगाव (प.)
 • मार्वे पंपिंग स्टेशनजवळ, मार्वे रोड, मालाड (प.)
 • मेंटेनन्स चौकीजवळ, साईनगर, कांदिवली फूटपाथ
 • एमएल चौकीजवळ, कांदिवाली (पूर्व)
 • पिंपळ गल्ली, हिंदुस्तान नाकाजवळ, कांदिवली
 • एम.सी.जी. एम प्लॉट, शिंपोली टेलिफोन एक्स्चेंज समोर, शिंपोली, बोरिवली (प.)
 • ११, जे. के कंपाऊंड, आहिल्य हैद मशीदजवळ, खैराणी रोड, साकीनाका, कुर्ला (प.)
 • शताब्दी रुग्णालयातील बायोगॅस प्रकल्पाजवळ

Updated : 23 Jun 2018 9:06 AM GMT
Next Story
Share it
Top