Home > मॅक्स स्पोर्ट्स > महेंद्रसिंग धोनीचे राजकरणात पदार्पण ?

महेंद्रसिंग धोनीचे राजकरणात पदार्पण ?

महेंद्रसिंग धोनीचे राजकरणात पदार्पण ?
X

सध्या सुरु असलेल्या भाजपच्या संपर्क अभियाना अंतर्गत आज भारतीय जनता पक्षाचे (बीजेपी) अध्यक्ष अमित शहा यांनी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भेट घेतली. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी शहा हे देशातील मान्यवर व्यक्तींची भेट घेत आहेत.त्याच निमित्ताने आज शहा यांनी नवी दिल्ली येथे धोनीची भेट घेतली. या भेटीवेळी त्यांच्यासोबत केंद्रीय रेल्वे मंत्री पीयुष गोयलही हजर होते. परंतू त्यांच्या महेंद्रसिंग धोनी यांच्यासोबतच्या भेटीनंतर धोनी राजकरणात पदार्पण करणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. याआधी इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत महेंद्रसिंग धोनीवर टीका झाली होती. या प्रकरणावरुन धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी, अशीही अनेकांनी टिका केली होती. तेव्हा आता अमित शहांनी घेतलेली धोनीची भेट चर्चेत आली आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग राजकरणात तर पदार्पण करत नाहीये ना अशी शंका जाणवते. आणि आज झालेली अमित शहा व धोनी यांच्यातील भेटीमुळे धोनी आता बीजेपीमध्ये जाणार का, या चर्चेला देखील उधाण आले आहे.

Updated : 6 Aug 2018 12:59 PM GMT
Next Story
Share it
Top