Home > मॅक्स स्पोर्ट्स > कोहलीने जागतिक गुणांकनात पटकावले नंबर वन स्थान...

कोहलीने जागतिक गुणांकनात पटकावले नंबर वन स्थान...

कोहलीने जागतिक गुणांकनात पटकावले नंबर वन स्थान...
X

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या बर्मिंगहॅम कसोटीत शतक आणि अर्धशतक झळकावणारा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली फलंदाजीत आयसीसी जागतिक गुणांकनात टॉपवर पोहचला आहे. असे यश प्राप्त करणारा कोहली हा सातवा हिंदुस्थानी क्रिकेटपटू ठरलाय.तब्बल सात वर्षानंतर एखाद्या हिंदुस्थानी फलंदाजाने जागतिक गुणांकनात नंबर वन स्थान पटकावले आहे. विराटने ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथलाही मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथवर आयसीसीने साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या दौऱ्यात चेंडू कुरतडण्याच्या गुन्ह्यावरून एक वर्षाची बंदी लादली आहे. स्मिथ फलंदाजी डिसेंबर २०१५पासून फलंदाजी गुणांकनात टॉपवर होता. फलंदाजी गुणांकनात टॉपवर होता आयसीसी फलंदाजी गुणांकनात टॉपच्या स्थानावर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर होता. आतापर्यंत सात फलंदाजांनी असा पराक्रम केला आहे. त्यात विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, राहुल द्रविड, सुनील गावसकर आणि दिलीप वेंगसरकर यांचा देखील समावेश आहे.

Updated : 6 Aug 2018 10:48 AM GMT
Next Story
Share it
Top