Home > मॅक्स स्पोर्ट्स > आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची सुवर्णपदकाची कमाई

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची सुवर्णपदकाची कमाई

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची सुवर्णपदकाची कमाई
X

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दहाव्या दिवशी अॅथलेटिक्सने भारताला सुवर्णपदकाची कमाई करुन दिली आहे. हे सुवर्णपदक मिळवणारे मनजीत सिंह आणि जिनसन जॉन्सन हे असून त्यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई केली आहे. तसेच या आधी सकाळच्या सत्रात भारताच्या पुरुष तिरंदाजी संघाने रौप्यपदकाची कमाई केली आहे. भारतीय संघाचं हे तिरंदाजीमधलं दुसरं रौप्यपदक ठरलं आहे.

तत्पूर्वी भारताच्या महिलांना सांघिक तिरंदाजी प्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. दुसरीकडे भारताच्या टेबल टेनिस संघाला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे.

Updated : 28 Aug 2018 1:46 PM GMT
Next Story
Share it
Top