Home > मॅक्स स्पोर्ट्स > टोकियो ऑलिम्पिक: भारतीय हॉकी संघ उपांत्य फेरीत दाखल, ग्रेट ब्रिटनचा ३-१ ने केला पराभव

टोकियो ऑलिम्पिक: भारतीय हॉकी संघ उपांत्य फेरीत दाखल, ग्रेट ब्रिटनचा ३-१ ने केला पराभव

टोकियो ऑलिम्पिक: भारतीय हॉकी संघ उपांत्य फेरीत दाखल, ग्रेट ब्रिटनचा ३-१ ने केला पराभव
X

भारताच्या पुरुष हॉकी संघाने ग्रेट ब्रिटनला ३-१ ने पराभूत करत रविवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत धडक मारली. भारताचा उपांत्य फेरीतील सामना हा बेल्जियम विरूध्द असा रंगणार आहे.

दिलप्रीत सिंह, गुरजंत सिंह आणि हार्दिक सिंहच्या गोलमुळे भारताने ग्रेट ब्रिटनला पुरुष हॉकीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत केलं आणि रविवारी टोकियो ऑलिंपिकची उपांत्य फेरीत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारताने ग्रेट ब्रिटनचा ३-१ असा पराभव करत अंतिम चारमध्ये स्थान मिळवलं आहे.

पहिल्या क्वार्टरच्या पहिल्या काही मिनिटांतच दिलप्रीत सिंहने गोल केले तर दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला गुरजंत सिंहने गोल केला.

मध्यांतरापर्यंत भारतीय संघाने आपली आघाडी कायम राखली पण सॅम्युएल इयान वार्डने ग्रेट ब्रिटनच्या खात्यात तिसऱ्या क्वार्टरच्या शेवटच्या क्षणी एक पेनल्टी कॉर्नरमध्ये गोल केला. पण हार्दिक सिंगने चौथ्या क्वार्टरमध्ये गोल करत भारताला ३-१ ने पुढे केले आणि भारतीय संघाने शेवटपर्यंत आपली आघाडी कायम राखली.

भारताचा उपांत्य फेरीतील सामना हा बेल्जियम विरूध्द रंगणार आहे. विशेष म्हणजे १९७२ नंतर तब्बल ४९ वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतीय संघ ऑलिंपिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाला आहे.

याशिवाय विक्रमी बाब म्हणजे ऑलिंपिक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक ८ सुवर्णपदके भारतीय संघानेच जिंकली आहेत. या ऐतिहासिक विजयामुळे भारतीय हॉकीच्या सुवर्ण काळाला उजाळा मिळाला आहे.

Updated : 1 Aug 2021 2:29 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top