Home > मॅक्स स्पोर्ट्स > दुबईत होणार आशिया कप क्रिकेट स्पर्धा

दुबईत होणार आशिया कप क्रिकेट स्पर्धा

दुबईत होणार आशिया कप क्रिकेट स्पर्धा
X

आशिया कप क्रिकेट स्पर्धा भारतात होणार होती. पण या स्पर्धेमध्ये पाकिस्तानचा समावेश आल्यामुळे भारतात खेळण्यास या संघाला अडचणींना सामोरे जावे लागू नये म्हणून हि स्पर्धा दुबईतील अबुधाबीत होणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने एमिरेटस क्रिकेट बोर्डाला या स्पर्धेच्या आयोजनाचे अधिकार सुपूर्द केले आहे.

या स्पर्धेत भारतासह अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका आदि देशांचा समावेश आहे. १५ ते २८ सप्टेंबर या दिवसांमध्ये हे सामने खेळवले जाणार आहेत. या वर्षाच्या प्रारंभीच आशियाई क्रिकेट परिषदेने ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीत होईल, पण त्याचे यजमान भारत असेल अशी घोषणा केली होती.

Updated : 18 Aug 2018 12:58 PM GMT
Next Story
Share it
Top