Home > मॅक्स स्पोर्ट्स > महाराष्ट्र बॅडमिंटन असोशिएशनच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा अरूण लखानी

महाराष्ट्र बॅडमिंटन असोशिएशनच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा अरूण लखानी

महाराष्ट्र बॅडमिंटन असोशिएशनच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा अरूण लखानी
X

गेल्या काही काळापासुन राज्यात चांगले बॅडमिंटन खेळाडू देखील तयार होत आहेत जे राष्ट्रीय स्पर्धांमध्ये नाव कमावत आहेत त्यामुळे महाराष्ट्र बॅडमिंटन महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला एक वेगळंच महत्व प्राप्त झालं होतं. महाराष्ट्र बॅडमिंटन असोशिएशनच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये अरूण लखानी यांचा दणदणीत विजय झाला आहे. लखानी हे सलग तिसऱ्यांदा एमबीएचे अध्यक्ष झाले आहेत. अरूण लखानी यांनी आपले नजिकचे प्रतिस्पर्धी प्रदीप गंधे यांचा ३७-१५ अशा मोठ्या फरकाने पराभव केला आहे.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधांची निर्मिती तसेच स्थानिक खेळाडूंना प्राधान्य या मुद्द्यांवर अरूण लखानी यांनी ही निवडणूक लढली होती. अरूण लखानी यांच्या पॅनेल मधील २५ उमेदवार निवडून आले तर एक उमेदवार अवघ्या एका मताने पराभूत झाला.

यंदाची MBA निवडणूक अतिशय चुरशीची होईल असं बोललं जात होतं. मात्र बॅडमिंटन ला नवी ऊंची मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने करत असलेल्या प्रयत्नांमुळे आपला विजय सोपा झाला असं एमबीए चे अध्यक्ष अरूण लखानी सांगतात. राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा घेणे, स्थानिक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंसोबत खेळण्याची संधी उपलब्ध करून देणे या उपक्रमांमुळे आपल्याला भरघोस पाठींबा मिळाला असं अरूण लखानी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. २०२२ ते २०२६ असा या नविन कार्यकारिणीचा कार्यकाळ असणार आहे.

Updated : 26 Sep 2022 7:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top