- नेदरलँड्समधे रंगला मिलान समर फेस्टिव्हल
- शिक्षक भरती घोटाळ्यात सहभागाच्या आरोपावर सत्तार यांचे उत्तर
- बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेले झाड पडले...
- सुप्रीम कोर्टाकडून कोणतीही आशा नाही- कपील सिब्बल
- भंडारा बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
- #Muskanbulletin : महागाईने सामान्यांचा संताप, विस्तार रखडल्याने शिंदे सरकार अडचणीत
- मंत्र्यांचे सर्वाधिकार सचिवांना?, अखेर सरकारचे स्पष्टीकरण
- महागाई आणि दडपशाही सहन करणार नाही – यशोमती ठाकूर
- शपथपत्र का गरजेचे आहे, उद्धव ठाकरेंनी सांगितले कारण..
- Priyanka Gandhi सिलेंडर घेऊन उतरल्या रस्त्यावर

सिंधू, साईना, श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत
X
तब्बल २० वर्षांनी होत असलेल्या सिनिअर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नागपुरकरांना देशातील दिग्गज खेळाडूंचा खेळ याची देही याची डोळा पाहण्याची संधी मिळत आहे. या स्पर्धेला नागपुरकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला. या स्पर्धेत आज अव्वल मानांकित पी.व्ही. सिंधू, द्वितीय मानांकित साईना नेहवाल आणि श्रीकांत किदांबानं हे खेळाडू सामने झाले. आज झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीत साईना, सिंधू आणि श्रीकांतनं अपेक्षेप्रमाणे उत्तम खेळ करून प्रेक्षकांची मनं जिंकली. नागपूरच्या विभागीय क्रीडासंकुलात या
स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. यात साईना, सिंधु आणि श्रीकांतचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. विशेत: शाळकरी मुलांची संख्या अधिक होती. साईना, सिंधुचा खेळ सुरू असताना विद्यार्थ्यांनी दोघींनाही दाद दिली. सिंधुनं महाराष्ट्राची रेवती देवस्थळे हिचा २१-१६, २१-२ असा पराभव केला. साईनानं तेलंगानाच्या जी. वृषालीचा २१-१२,२१-१० असा पराभव केला. २० वर्षांच्या अंतराने नागपुरात प्रथमच राष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन होत आहे. इथल्या उत्तम व्यवस्थेनं खेळाडूंनी समाधान व्यक्त केलं. या स्पर्धेमुळं भविष्यातील साईना, सिंधु आणि श्रीकांत तयार होतील तसंच खेळाला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास
महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अरूण लखानी यांनी व्यक्त केला.