Home > मॅक्स स्पोर्ट्स > पत्रकार चषकावर लोहमार्ग पोलिसांनी कोरले नाव

पत्रकार चषकावर लोहमार्ग पोलिसांनी कोरले नाव

पत्रकार चषकावर लोहमार्ग पोलिसांनी कोरले नाव
X

द ईस्टर्न प्रेस असोसिएशन आयोजित पत्रकार चषक 2017 क्रिकेट स्पर्धा रविवारी पार पडली. स्पर्धेचा अंतिम सामना वाहतूक पोलीस संघ विरुद्ध लोहमार्ग पोलीस यांच्यात झाला. 5 षटकांच्या सामन्यात लोहमार्ग पोलिसांनी बाजी मारली. या स्पर्धेला लोहमार्ग पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोबतच उपायुक्त सचिन पाटील, डॉ विनायक राठोड, राष्ट्रीय हॉकीपट्टू युवराज वाल्मिकी, विनोदी कलाकार व्हीआयपी, मॅक्स महाराष्ट्रचे मुख्य संपादक रवींद्र आंबेकर, विलास आठवले, मनोज भोईर, टिव्हीजेएचे अध्यक्ष विमल सिंग इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा अंतिम निकाल

विजयी संघ :- लोहमार्ग पोलीस संघ

उपविजयी संघ :- वाहतूक पोलीस संघ

मालिकावीर :- प्रताप देसाई(परिमंडळ सहा पोलीस संघ)

अंतिम सामनावीर :- अनिल शेंडे(लोहमार्ग पोलीस)

उत्कृष्ट फलंदाज : प्रशांत पांडे(द ईस्टर्न प्रेस असोसिएशन)

उत्कृष्ट गोलंदाज :- प्रताप देसाई(परिमंडळ सहा पोलीस संघ)

Updated : 29 May 2017 7:14 AM GMT
Next Story
Share it
Top