Home > मॅक्स रिपोर्ट > मानधन रखडल्याने अंगणवाडी सेविकेची आत्महत्या

मानधन रखडल्याने अंगणवाडी सेविकेची आत्महत्या

मानधन रखडल्याने अंगणवाडी सेविकेची आत्महत्या
X

गेले पाच महिने मानधन न मिऴाल्याने तसेच दहा वर्षे जुने रजिस्टरसाठी अधिकाऱ्यांनी तगादा लावल्याने परभणीतील बोर्डी गावच्या अंगणवाडी सेविका सुमित्रा सवंडकर यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झालाय. सवंडकर नागनगाव येथील अंगणवाडीत कार्यरत होत्या. त्यांना गेल्या जून महिन्यांपासूनचे मानधन मिळाले नव्हते, तसेच बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी २००८ पासूनचे रजिस्टर आणण्याची सारखी मागणी केल्याने वैतागून आत्महत्या करत असल्याचे सवंडकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवलं आहे.

गेले पाच महिने मानधन नसल्याने झेरॉक्सचा, रजिस्टरचा खर्च कसा करायचा, तसेच कामावर जाण्या- येण्याचे रोजचे वीस रुपये कुठून आणायचे असंही सवंडकर यांनी चिठ्ठीत म्हटलय. सवंडकरांच्या आत्महत्येमुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यात तीव्र संताप व्यक्त होत असून, दहा वर्षं जुन्या रजिस्टरसाठी सारखा तगादा लावणाऱ्या बालविकास अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

Updated : 8 Nov 2017 4:56 PM IST
Next Story
Share it
Top