Home > मॅक्स ब्लॉग्ज > त्या ३५०० रुपयांची मी चुटकीसरशी विल्हेवाट लावली होती !

त्या ३५०० रुपयांची मी चुटकीसरशी विल्हेवाट लावली होती !

त्या ३५०० रुपयांची मी चुटकीसरशी विल्हेवाट लावली होती !
X

परवा म्हणजे २८ ऑगस्टपासून 'सोनी ' वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता 'कौन बनेगा करोडपती 'या लोकप्रिय गेम शोची पुन्हा सुरुवात होतेय . 'लॉक किया जाये ' 'देवियों और सज्जनों ' असे चिर -परिचित स्वर पुन्हा घरोघरी गुंजतील ! महानायक अमिताभ बच्चन यांच्या खास 'बच्चन ' शैलीत हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकाला ते आपल्या मधाळ शब्दांनी जिंकून घेतील .. स्पर्धकाने जिंकलेली रक्कम अर्थात त्याच्यासाठी मग 'बोनस ' रक्कम ठरते ! यंदाचे 'के बी सी ' चे हे नववे पर्व असून ह्यात ३५ भाग असतील . जॅकपॉट प्रश्न म्हणजे शेवटच्या प्रश्नाचे उत्तर बरोबर आल्यास विजेत्या स्पर्धकास ७ कोटी रूपयांची घसघशीत रक्कम मिळणार आहे .. अमिताभ बच्चनशी थेट -भेट आणि शिवाय 'नशिबाची परीक्षा असा रंगतदार सामना पाहण्यास कोण उत्सुक नसेल ?

'केबीसी ' वर आधारित ही बिग बीची खास मुलाखत

-----------------------------------------------------------------------------------

1.'अमितजी , के बी सी - सीझन ८ नंतर सीझन ९ सुरु होण्यासाठी बराच कालावधी गेलाय , याचे काही कारण ? अमिताभ - ' के बी सी - सीझन ८ किती काळ चालू होता हे आता काही स्मरत नाहीये मला . पण त्यावर विचार करण्यात फार अर्थ नाही ! दुनिया में अक्सर ऐसा होते हम देखते है ,कि बिना संजोग कुछ नहीं होता ! असो , के बी सी ची सुरुवात झाली ती स्टार प्लस वाहिनीवर प्रथम सुरु झाली होती. हा प्रोग्रॅम ब्रेन चाईल्ड आहे 'सिद्धार्थ बसू ' यांचा, त्यांच्याशी अतिशय जवळचा स्नेह निर्माण झालाय. त्यावेळी स्टार प्लसतर्फे समीर नायर देखील 'कौन बनेगा करोडपती ' सुरु करण्यासाठी धडपडत होते . सिद्धार्थ बसू यांनी 'हु वॉण्टस टु बी मिलिनिएर ' ह्या ओरिजिनल इंग्लंडमधील गेम शोचे फॉरमॅट मला दाखवले , अर्थात या शोचे सादरीकरण मला हिंदीत करायचे होते. आरंभी खूप आव्हान नक्की होते . असो ... सिद्धार्थ बसू आणि त्यांची पूर्ण टीम , आणि अगदी शेकडो टीम मेम्बर्सचे सहकार्य , थोडी बहुत माझी मेहनत यामुळे कार्यक्रम क्लिक झाला . कधी वेळेअभावी तर कधी काही तांत्रिक कारणांनी कार्यक्रमाचे पुढचे पर्व सुरु होण्यास विलंब झाला तरी हम ऐसा मानकर चलते है की 'अंत भला तो सब भला ! ' .

2.' २८ ऑगस्टपासून 'कौन बनेगा करोडपती ' चे नववे पर्व सुरु होतंय ,.. काय वेगळं असेल त्यात ?'

अमिताभ - ' हु वॉण्टस टु बी मिलिनिएअर ' ह्या कार्यक्रमाच्या मूळ रुपरेखेत फार बदल करता येत नाही . पण सध्या ह्यात दोन बदल केले गेले आहेत . ' फोन अ फ्रेंड ' या लाईफ लाईनचे नवे नाव ' व्हिडीओ अ फ्रेंड ' असे केले असून ह्यात हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकाला आपल्या मित्राचा केवळ आवाजच नव्हे तर व्हिडीओही दिसून येणार आहे . 'जोडीदार ' ह्या नव्या लाईफलाईन मध्ये हॉट सीटवरचा स्पर्धक त्याच्यासोबत असलेल्या 'जोडीदाराला ' अडचणीत असलेल्या प्रश्नावेळी त्याची थेट मदत मागू शकतो . आणि हो , स्पर्धकाने कमीत कमी आणि जास्तीत जास्त पैसे जिंकले तरी पुरस्कार प्राप्त रक्कम ऍक्सिस बँकेच्या त्याच्या अकाउन्टमध्ये जमा होणार आहे . '

3.' अमित जी , हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकाला तुम्ही प्रश्न विचारता , 'क्या करोगे आप जिती हुई धनराशी का ?' तुम्हाला प्रथम जेव्हा मोठी रक्कम हाती आली , तुम्ही त्याचा विनियोग कसा केलात ?'

अमिताभ - ' हॉट सीटवर बसलेला स्पर्धक 'कौन बनेगा करोडपती ' स्पर्धा ही जिंकण्यासाठी देशाच्या अगदी दुर्गम भागातूनही मुंबईत 'कौन बनेगा करोडपती ' च्या सेटवर येत असतो . बहुतेक स्पर्धक तळागाळातून आलेले असतात , त्यांची प्रत्येकाची निकड वेगळी असते . कुणाला आजारी व्यक्तीवर इलाज करायचा असतो , कुणाला मुलांच्या शिक्षणावर खर्च करायचा असतो , तर कुणाला शेतीचे कर्जही फेडायचं असतं ! माझ्या प्रश्नाने त्यांचे मनाचे बांध सैलावतात ! ते मोकळेपणाने बोलतात .. त्यांना बोलते करण्यासाठी माझा प्रश्न त्यांना मी विचारतो .. 'हर इन्सान के जीवन मी पैसे बहुत मायने रखते है , लेकींन पहली बार जब कोई बडी रकम हाथो में आती है , कई बार हम पगला भी जाते है ! माझ्या बाबतीत सांगायचा किस्सा म्हणजे - १९६८ -६९ दरम्यान मी कोलकात्यात एका कंपनीत पदवीधर म्हणून महिना ६०० रुपये पगारावर नोकरीस लागलो . जवळजवळ १०० रुपये इन्कम टॅक्समध्ये जात , हाती उरत ५०० रुपये ! तरी बरं माझे तेव्हा लग्न झाले नव्हते ! ५०० रुपयात काटकसरीने महिना घालवण्यावाचून पर्याय नव्हता .. त्या दरम्यान कंपनीने आवाहन केले , कर्मचाऱ्यांनी (बंगाली नसलेले ) बंगाली भाषा शिकून घ्यावी , त्यासाठी त्यांना ३५०० रुपये एकरकमी भत्ता देण्यात येत आहे .. काय सांगावं ? कोण आनंदलो मी ! झटकन ही रक्कम ताब्यात घेतली मी आणि ४८ तास पूर्ण होण्याआधी मी ते पैसे खर्चून देखील टाकले . . ३५०० रुपये हातांत येणे म्हणजे मोठे घबाड हाती आल्यासारखे झाले होते मला .. दोन दिवसांतच पैसे खर्च करून मी ऑफिसमधल्या बंगाली सहकाऱ्यांना मला बंगाली शिकवण्याची विनंती केली ! (अर्थातच ते माझ्याकडून शिकवणीचे पैसे मागणार नव्हते , याची मला खात्री होती ! )

4.' के बी सी ' चे संचालन म्हणजे अमिताभ बच्चन हे समीकरण पक्कं झालं आहे , पण हा शो गेली १७ वर्षे तुम्ही मनापासून करताय , तुम्हांला हा शो करणे आवडते याचे कारण काय ?'

अमिताभ - '२०००च्या दशकांत हा कार्यक्रम प्रथम माझ्याकडे आला . . माझ्या कुटुंबातून म्हणजे जया , अभिषेक यांनी मला गळ घातली , मी ह्या कार्यक्रमाच्या संचालनापासून दूर राहावं , माझ्या वाढत्या वयात मी भलती आव्हानं स्वीकारू नये , एका जागी बसून ८-१० तास शूटिंग करत अखंड बोलू नये असं त्यांना प्रकर्षाने वाटायचं .. मला कर्जातून बाहेर पडायचं होतं , आणि 'केबीसी ' चे संचालन करून माझ्यावरचे कर्ज दूर होणार होते ! मी जया -अभिषेकचे न ऐकता 'केबीसी ' साठी होकार दिला ! पण त्या वेळेस ती माझी गरज होती .. नंतर मी मनाने 'केबीसी ' शी कधी जोडला गेला माझ्याही लक्षात आलं नाही ! 'कौन बनेगा करोडपती ' शो देशांतील सर्वसामान्य जनतेची स्वप्नं -महत्त्कांक्षा पूर्ण करतो ! ह्या व्यासपीठाद्वारे मी सर्व -सामान्यांच्या विचारांशी , प्रश्नांशी , स्वप्नांशी , आणि महत्वकांक्षांशी जोडला जातो , त्यांचं 'जीवन ' फील ' करतो ... माझ्या परीने कधी ह्या स्पर्धकांना फूल न फुलाची पाकळी देऊ करतो ! माझे ह्या शो शी भावनिक नाते जोडले गेले आहे .. ह्या कार्यक्रमात आलेले माझ्या घरी आलेले पाहुणे आहेत , त्यांना 'कम्फर्ट फील ' द्यावा अशी माझी भावना असते .. माझ्यावर अतोनात प्रेम करणारे हे पाहुणे 'मेरे अपने मेहमान ' होते है , त्यांच्या प्रेमाची मला सवय जडून गेलीये ! '

5.'देशाला भेडसवण्याऱ्या समस्या तुम्हालाही त्रस्त करतात का ? '

अमिताभ -' देशाला स्वातंत्र मिळून ७० वर्षे लोटली , पण आजही देशातल्या मूलभूत समस्या कायम आहेत हे पाहून माझं आणि अनेकांचं मन द्रवतं ! द्रारिद्र्यरेषेखालची जनता असो , लिंगभेद , स्त्री भ्रूण हत्या असो , महिलांवरचे अत्याचार असो , भ्रष्टाचार असो , खूप प्रश्न आहेत ह्या देशाचे !

म्हणूनच जेव्हा आरोग्य विषयक योजना जाहीर होतात , माझ्या सहभागाची गरज असले तेंव्हा कुठलाही मोबदला न घेतां मी अशा योजनांसाठी सक्रिय पाठिंबा देतो , टीबी निर्मूलनासाठी मला सदिच्छा दूत म्हणून नेमणूक केले होते .. २००० च्या दशकांत मला 'केबीसी ' चे शूटिंग करतांनाच पाठ दुखू लागली , निदान टीबीचे झाले ! वेळेवर उपचार केल्याने मी रोगमुक्त झालो !

टीबीचे प्रमाण आताशा देशात कमी झाले असले तरी त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मी योजनेचा सदिच्छा दूत झालो ! त्यामागे देखील एक सबळ कारण होते .

१९८२ मध्ये 'कुली ' सिनेमाच्या सेटवर मला तो जीवघेणा अपघात घडला , त्यानंतर मृत्यूशी झुंज देत मी वाचलो , माझे प्राण खरं म्हणजे २५० डोनर्स (रक्त दाते )ने वाचवले , त्या रक्तात कुणाला तरी हेपेटायटिस बीचा प्रादुर्भाव झाला होता , ह्या दूषित रक्ताने माझे लिव्हर दूषित झाले ! आजही माझं लिव्हर फक्त २५ टक्के कार्यरत आहे , ७५ टक्के त्याची कार्यक्षमता त्या आजारात संपली आहे ! आज आरोग्य विषयावर मी जमेल तसे योगदान देतो त्याचे मुख्य कारण हे ! मी ह्या आजारांना तोंड दिलंय !-माझ्यावर भरभरून प्रेम करण्याऱ्या ह्या जनतेच्या प्रेमाने मला वेळोवेळी जीवनदान दिलंय !

मला झालेल्या आजारांचा गवगवा करण्याचा माझा हेतू नसून सामान्य जनतेची आरोग्यविषयक जाणीव अतिशय प्रगल्भ व्हावी , वेळीच उपचार करून त्यांनी रोगमुक्त व्हावे अशी माझी मनापासून इच्छा असते ! '

6.'तुम्ही '१०२ नॉट आऊट ' ह्या आगामी सिनेमात १०२ वर्षीय वृद्धाची भूमिका करताय ? काय विशेष ह्या सिनेमाचं -भूमिकेचं ?

'अमिताभ - ' हमारे फिल्मो की बाते फिर कभी तसल्ली से करेंगे ! '१०२ नॉट आऊट ' फिल्म में हमने १०२ वर्षीय बुजुर्ग का किरदार निभाया है ! उमेश शुक्ल निर्देशित इस फिल्म में मेरे बेटे का किरदार ऋषी कपूर साहब ने निभाया है ! ऋषी जी यानी चिंटू जी के साथ हमने काफी पहले कूछ फिल्मे साथ में की थी . 'अमर अकबर अँथनी ' ' नसीब ' 'कुली ' 'कभी -कभी ' ..हमारी जोडीवाली फिल्मे कामयाब भी हुई और हमें दर्शको ने काफी पसंद भी किया था ! मुझे पुरी उम्मीद है '१०२ नॉट आऊट ' को भी पसंद किया जायेगा '

Updated : 27 Aug 2017 7:38 AM GMT
Next Story
Share it
Top