जे.जे. रुग्णालयातील भुतामागचं सत्य
X
मुंबईतील जे.जे. रुग्णालयात भूत असल्याची जोरदार अफवा सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल आहे. त्यासाठी एक व्हिडीओ सर्क्यूलेट केला जात आहे. सध्या व्हॉट्स ऍपवर या व्हिडीओनं चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मुंबईतील एक मोठं आणि सुप्रसिद्ध तसंच गरिबांना परवडणारं रुग्णालय म्हणून जे.जे. रुग्णालयाची ख्याती आहे. राज्याच्या कान्याकोपऱ्यातून दररोज हजारो लोकं इथं उपचारासाठी येत असतात. पण, या भूताच्या अफवेनं लोकांच्या मनात शंका उपस्थित केली आहे. पण, हा व्हिडीओ जे.जे. रुग्णालयातला नाही. हा व्हिडीओ कुठला आहे. हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही.
https://youtu.be/tJueauD_-58
“हा व्हिडीओ पूर्णतः खोटा आहे. त्याचा आणि जे.जे. रुग्णालयाचा काहीच संबंध नाही. जे.जे. रुग्णालयात भूत असल्याची उगाच अफवा पसरवली जात आहे. आम्ही या संदर्भात पोलीसात तक्रार देणार आहोत” असं जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलतांना दिली आहे.
त्यामुळे हा व्हिडीओ खोटा आहे. तसंच जे.जे. रुग्णालयाबाबत अफवा फसरवली जात असल्याचं स्पष्ट झालं आहे.






