कोपर्डीच्या आरोपींना फाशी की जन्मठेप? आज होणार फैसला
X
राज्यभरात तीव्र पडसाद उमटलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणाचा निकाल आज लागणार आहे.
कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींच्या शिक्षेवर दोषींना आज शिक्षा सुनावली जाणार आहे. सध्या सरकारी वकील उज्वल निकम सराकर तर्फे अंतिम युक्तीवाद सादर करत आहेत. नितीन भैलुम (२३), जितेंद्र उर्फ पप्पु बाबूलाल शिंदे(२५), आणि संतोष भवाळ (३०) या आरोपींना न्यायालय फाशी की जन्मठेपेची शिक्षा देणार याकडे जनतेच लक्ष लागून राहीले आहे. न्यायालयाने या अाधीच यांना दोषी ठरवले आहे. मंगळवारपासून बचाव पक्ष आणि सरकारी पक्षाकडून अंितम युक्तीवाद सुरु झाला आहे. मंगळवारी आरोपींतर्फे त्यांच्या वकिलांनी बाजू मांडताना न्यायालयात अारोपिेचे वय आणि त्याच्या शिक्षण तसेच घरातील एकमेव आधार आदी मुद्दे विचारात घेऊन न्यायालयाने आरोपिंना जन्मठेप सुनावण्यात यावी असा युक्तीवाद केला होता. आज नगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात विशेष सरकारी वकील उज्वल निकम सरकारतर्फे युक्तीवाद सादर करत आहेत.