Home > मॅक्स रिपोर्ट > कमला मिल कम्पाऊंडमध्ये 'अग्नितांडव'

कमला मिल कम्पाऊंडमध्ये 'अग्नितांडव'

कमला मिल कम्पाऊंडमध्ये अग्नितांडव
X

मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल कम्पाऊंडमध्ये लागलेल्या भीषण आगीत १५ जणांचा होरपळून मृत्यू झाला तर ५५ जण जखमी आहेत. मृतांमध्ये १२ महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.

कमला मिल कम्पाऊंडमधील ट्रेड हाऊस इमारतीमध्ये गुरुवारी रात्री साडे बाराच्या सुमारास ‘१ अबव्ह’ या बारमध्ये आग लागली. इमारतीच्या टेरेसवर बांबू आणि प्लास्टिकचे छप्पर असल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. टेरेसवर ‘१ अबव्ह’ आणि त्याच्या बाजूला मोजोस ब्रिस्ट्रो पब आहे. आगीचे लोण तिथेही पोहोचले. ही घटना घडली त्यावेळी तिथे सुमारे ५० हून अधिक जण उपस्थित होते. यातील १५ जणांचा मृत्यू झाला. तर ५५ जण जखमी झाले. तर काहींना वेळीच बाहेर पडता आल्याने ते बचावले आहेत. घटनेच्या वेळी बारमध्ये खूशबूू मेहता या २९ वर्षीय तरुणीच्या वाढदिवसाची पार्टी सुरु होती. आग नेमकी कशामुळे आग लागली, हे अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी ‘१ अबव्ह’ च्या मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. लाकडी फर्निचर, प्लास्टिक आणि बांबू यामुळे आग पसरत गेली. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

कमला मिल कम्पाऊंडमध्ये अंदाजे ४२ रेस्टॉरंट आणि पब आहेत. या आगीचा फटका काही वृत्तवाहिन्यांच्या कार्यालयांनाही बसला आहे. मुंबईचे पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

Updated : 29 Dec 2017 2:17 PM IST
Next Story
Share it
Top