अमृताताई आमचंही सौभाग्य जपा !
X
यवतमाळ जिल्ह्यातील महिलांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना पत्र लिहून दारू बंदीची आर्त हाक दिली आहे. पत्रात या महिलांनी दारूमुळे आमचे संसार उध्वस्त होत असून आमचे संसार वाचवण्यासाठी आपले पती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष घालायचे सांगा असे म्हटले आहे
काय आहे या पत्रात
आदरणीय अमृता ताई फडणवीस,
पत्र लिहण्याचे कारण यवतमाळ जिल्हयातील आमच्या घरात, दारात दारूणे थैमाण घातले आहे. माझे हजारो बहिनी या दारूमुळे विधवा झाल्या आहेत. तुझ्या सारखेच अखंड सौभाग्यवती राहण्याची माझी ही इच्छा आहे, पण ही दारू माझे सौभाग्य केव्हा हिरावून घेईल ह्याची काही खात्री उरली नाही. राज्याचे मुख्यमंत्री असलेले तुझे पती यांना सांगुन आमच्या जिल्हयाची दारूबंदी करून घे व तुझ्यासारखे अखंड सौभाग्य आम्हास मिळू दे.
दरम्यान या पत्रानंतर या महिलांची आर्त हाक ऐकुण मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या पत्राला कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे आहे.