Home > मॅक्स रिपोर्ट > MaxMaharashtra Impact:अखेर येरळा नदीवरील त्या पुलासाठी निधी मंजूर नागरिकांनी मानले मॅक्स महाराष्ट्रचे आभार

MaxMaharashtra Impact:अखेर येरळा नदीवरील त्या पुलासाठी निधी मंजूर नागरिकांनी मानले मॅक्स महाराष्ट्रचे आभार

मृत्यूचा पुल म्हणून प्रसिद्ध असलेल्या सांगली जिल्ह्यातील रामापुर कांपुर येथील येरळा फुलाची उंची वाढवण्याची प्रलंबित मागणी अखेर मंजूर झाली असून नागरिकांनी त्या बद्दल मँक्स महाराष्ट्राचे आभार व्यक्त केले आहेत.

MaxMaharashtra Impact:अखेर येरळा नदीवरील त्या पुलासाठी निधी मंजूर नागरिकांनी मानले मॅक्स महाराष्ट्रचे आभार
Xमृत्यूचा पुल म्हणून कु-प्रसिद्ध असलेल्या सांगली जिल्ह्यातील रामापुर कमळापुर येथील येरळा नदीवरील पुलाची उंची वाढावी ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून ग्रामस्थांची होती. परंतु या समस्येकडे अनेक वर्षे दुर्लक्ष झाले होते. या पुलावरून प्रवासी वाहून जाण्याचा घटना अनेकदा घडल्या होत्या.

यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रने वारंवार या पुलाची समस्या महाराष्ट्रासमोर आणली होती. येरळा नूतन पुल संघर्ष समितीने ऐन थंडीच्या दिवसात या पुलावर केलेले ठिय्या आंदोलनदेखील मॅक्स महाराष्ट्रने दाखवले होते. मॅक्स महाराष्ट्रने दिलेल्या बातम्यांमुळे राज्यमंत्री विश्वजित कदम यांना या आंदोलनाची दखल घ्यावी लागली. त्यांनी आंदोलकांची भेट घेत या ठिकाणी मोठ्या उंचीचा पुल बांधण्याचे आश्वासन दिले होते. विश्वजीत कदम यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करत हिवाळी अधिवेशनात या पुलासाठी सात कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. तसेच उर्वरित दहा कोटी येत्या आर्थिक बजेट मध्ये पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.

मॅक्स महाराष्ट्रने वारंवार केलेल्या पाठपुराव्याने या पुलाचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत नागरिकांनी मॅक्स महाराष्ट्रचे आभार मानले आहेत.


हेही वाचा:

https://www.maxmaharashtra.com/amp/max-reports/when-will-built-new-bridge-on-yerala-river-last-month-youth-drowned-away/63595/


Updated : 2022-01-11T11:40:20+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top