Home > मॅक्स रिपोर्ट > तंत्रज्ञान, पैसा पृथ्वीला वाचू शकत नाही: गिरीश राऊत

तंत्रज्ञान, पैसा पृथ्वीला वाचू शकत नाही: गिरीश राऊत

दिवसेंदिवस हवामान बदलाचे परिणाम पृथ्वीवरील जीवसृष्टीवर होऊ लागला आहे. महाराष्ट्रात अवकाळी पडणारा पाऊस त्यामुळे होणारे शेतीचं नुकसान तसेच आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही तुम्ही-आम्ही सुरक्षित आहोत का? आज जागतिक हवामान दिन त्यानिमित्ताने वसुंधरा धोक्यात आहे का? काय घडतंय पृथ्वीच्या पोटात?

तंत्रज्ञान, पैसा पृथ्वीला वाचू शकत नाही: गिरीश राऊत
X

वातावरणातील बदलांचे दृश्य परिणाम जगभर जाणवू लागले असून त्यांची गांभीर्याने दखल घेऊन योग्य उपाययोजना करण्याचे महत्त्व दिवसेंदिवस अधिकाधिक स्पष्ट होत चालले आहे. जंगलांना लागणार्‍या वणव्यांमध्ये होत असलेली वाढ, उष्णतेच्या लाटा, महापूर, भूकंपांचे धक्के आणि ज्वालामुखींचे उद्रेक, विविध चक्रीवादळांचे तडाखे, समुद्रात उसळणार्‍या अवाढव्य उंचीच्या लाटा आणि प्राणी-पक्षी यांच्या संख्येत होत चाललेली घट या सगळ्याला प्रदूषण कारणीभूत आहे का?

गेल्या २५० वर्षात पृथ्वीवरील ४८% कार्बनडायॲाक्साइडच्या वाढला आहे. या वाढीला जबाबदार कोण आहे?

आपल्या भोवतीच्या सततच्या बदलत्या हवामानाचा आपल्यावर काय परिणाम होतो का? नासाचा अहवाल काय सांगतो? यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्र ने ॲड गिरीश राऊत यांच्याशी बातचीत केली.

राऊत सांगतात की, येणारा काळ पृथ्वीसाठी खूप धोकादायक आहे.

"तंत्रज्ञान, पैसा पृथ्वीला वाचू शकत नाही" संपूर्ण जीवसृष्टी धोक्यात आली आहे.

गेल्या वर्षभरापासून जगावर आलेल्या करोना महामारीवर राऊत सांगतात की, "कोरोना ६ महिन्यापूर्वी निष्प्रभ झाला" करोनाबाबतीत लोकांमध्ये भय पसरविण्याचे काम सुरु आहे. तसेच हवामानात होणारे बदल मानवजातीवर भयंकर परिणामकारक आहेत. मात्र, "हवामानाशी निगडीत बातम्या मीडिया दाखवत नाही." सत्य दडवलं जात आहे असं माध्यमांबाबत राऊत यांनी म्हटलं आहे.

संपूर्ण जीवसृष्टी वाचवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. वाढते औद्योगिकरण हे देखील घातक ठरत चाललं आहे.

वातावरणातील कार्बनडाॲाक्साइड कशा पद्धतीने कमी करता येईल आणि हरितद्रव्यांची वाढ कशी करता येईल याचा विचार करुन प्रत्येका ने आपल्या वर्तवणूकीत बदल केला पाहिजे. असं राऊत यांनी म्हटलं आहे.


Updated : 23 March 2021 2:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top