Home > मॅक्स रिपोर्ट > कोरोनाच्या महामारीत कामगारांना धरलंय जातंय वेठीस...

कोरोनाच्या महामारीत कामगारांना धरलंय जातंय वेठीस...

कोरोनाच्या महामारीत कामगारांना धरलंय जातंय वेठीस...
X

पालघर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील में. बॉम्बे रेयॉन फॅशन या कामगारांचा जानेवारी २०२० पासून थकित पगाराचा प्रश्न चिघळला असून, मागील तीन महिन्यांपासून हे कामगार पगारासाठी आंदोलन करत आहे. मात्र, कंपनीनं कामगारांना कामावर न घेता इतर काही कामगारांना कामावर बोलावून त्यांना पगार दिला जात आहे. कामगारांनी १ जुलै सकाळी ७ वाजले पासून, कंपनीच्या गेटवरती कामबंद आंदोलन सुरु केलं आहे.

रेयॉन फॅशन लि. या कंपनीने जानेवारी २०२० पासून त्यांच्या जवळपास 3000 कामगारांना पगारच दिलेला नाही. लॉकडाऊनच्या कालावधीत पाच वेळा आंदोलने करून व कंपनी व्यवस्थापनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर ही कामगारांना पगार दिलेला नाही.

दरम्यान लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जून महिन्यात कंपनीने मालकाने काही मर्जीतल्या कामगारांना त्यांचा पगार देऊन पुन्हा कामावर बोलावून कंपनी सुरू केली. आंदोलन करणाऱ्या कामगारांना पगार ही दिला नाही व कामावरती ही घेतले नाही. तसेच कंपनी मालक कामगारांचे थकित पगार देत नसल्याने आरआरसी रिव्हेन्यू रिकव्हरी प्रमाणपत्र वसुली बाबत जिल्हाधिकारी पालघर यांना कळवले असताना त्यांच्या कडूनही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी कंपनीच्या गेटवरती कामबंद आंदोलनास सुरवात केली आहे. यात जवळपास 200 हून अधिक महिला कामगारांचा ही समावेश आहे. बोईसर एमआयडीसी मधील प्लॉट न, जी.९५ येथील कंपनीच्या प्रवेशद्वार समोर कर्मचाऱ्यांचा संप सुरू असुन रोज सकाळी सर्व कर्मचारी एकत्रीत जमा होऊन ठिय्या देत दिवसभर घोषणाबाजी करत आहे.

आज दहाव्या दिवशी भर पावसात हे संपकरी कामगार कंपनीच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करत घोषणा देऊन आपला जानेवारी पासूनच्या पगाराची मागणी करत आहेत. आंदोलनाला दहा दिवसाचा कालावधी उलटूनही याकडे ना कंपनी प्रशासन फिरकले ना लोकप्रतिनिधी यामुळे कामगारांकडून प्रचंड खदखद व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे आज दहाव्या दिवशी देखील भर पावसात कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत दिवसभर घोषणाबाजी केली. त्याच बरोबर कोविड १९ चा विचार लक्षात घेता कामगारांनी १२ ते १५ या संख्येने सुरक्षित अंतर ठेवून हे आंदोलन सुरू ठेवले आहे.

या सर्व कामगारासाठी अल्पोपहाराची व्यवस्था ते आळीपाळीने एकमेकांना घरी जाण्याची मुभा देवून पार पाडीत आहेत. संप सुरू राहील. त्या दिवस अखेरपर्यंत याच रोटेशन प्रमाणे अल्पोपहाराची व्यवस्था करून हे आंदोलन मागण्या पूर्ण होत नाहीत. तो पर्यंत सुरू ठेवणार असल्याचे येथील कामगारांनी मॅक्स महाराष्ट्र शी बोलताना सांगितले.

कारखान्यात असलेले जवळपास ५०० च्या आसपास अधिकारी कामावर जाताना एकित्रतपणे कारखान्यात जातात. व त्याच प्रमाणे बाहेर येतात. त्यावेळी प्रवेशद्वारावर संपकरी कामगारांची जोरदार घोषणा बाजी सुरू असते.

दरम्यान, कंपनी व्यवस्थापक माळी यांच्याशी याप्रकरणी संप सुरू झाल्या दिवसांपासून पत्रकार त्यांच्या फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, ते त्याला प्रतिसाद देत नाहीत. ह्या आंदोलनाला दहा दिवस पूर्ण झाले असताना आंदोलनाकडे कंपनी प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. आतापर्यंत एकही अधिकारी या संपकऱ्र्यांकडे चर्चा करण्यासाठी किंवा मागण्या बाबत भूमिका आहे. प्रशासनाची हे सांगण्यासाठी आले नसल्याचे कामगारांनी सांगितले. त्यामुळे कंपनी प्रशासन व व्यवस्थापन विभागाविषयी कामगारांत मनस्वी चीड व्यक्त होताना दिसत आहे.

या कंपनीत गेल्या पाच ते सहा वर्षापासून काम करीत आहोत. असे असताना गेल्या सहा महिन्यांपासून पगार थकविण्यात आला आहे. यामुळे आमच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आहे. त्यामुळे आम्ही जे काम केले आहे. त्याचाच पगार मिळावा अशी आमची मागणी आहे. जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही. तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार आहोत. कामगार सिद्धेश जाधव यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना सांगितले.

Updated : 11 July 2020 10:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top