Home > Election 2020 > मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त बंदोबस्तासाठी गेलेल्या महिला पोलिसाचा अपघातात मृत्यू

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त बंदोबस्तासाठी गेलेल्या महिला पोलिसाचा अपघातात मृत्यू

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त बंदोबस्तासाठी गेलेल्या महिला पोलिसाचा अपघातात मृत्यू
X

मुख्यमंत्री यांचा बंदोबस्त संपल्यानंतर अक्कलकोट येथून सोलापूर कडे येताना सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील महिला पोलीस आरती साबळे यांचे कोन्हाळी जवळ अपघाती निधन झाले. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

पोलीस मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या आरती साबळे या मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तासाठी अक्कलकोट येथे गेल्या होत्या. मुख्यमंत्री फडणवीस हे सोलापूर लोकसभा निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजींच्या प्रचारासाठी अक्कलकोट येथे आले होते. तेथे त्यांची जाहीर सभा होती. त्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या बंदोबस्तासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या महिला पोलीस शिपाई आरती साबळे या सकाळीच अक्कलकोटला गेल्या होत्या. सभा संपल्यानंतर त्य़ा सोलापूरकडे येत असताना त्यांच्या दुचाकीचा कोनाली ता. अक्कलकोट येथे अपघात झाला.

Updated : 12 April 2019 3:54 PM IST
Next Story
Share it
Top