नोटाबंदीनंतर देशातल्या अर्थव्यवस्थेवर कमालीचा परिणाम झालाय. मात्र, त्याबाबत कुठल्याही राजकीय पक्षाकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात फारसं बोललं जात नाही. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी या मुद्द्याला हात घातलाय. आपलं सरकार आलं तर जुन्या नोटा बदलून देऊ, असं आश्वासन त्यांनी दिलंय.
नोटाबंदीमुळं व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, कित्येक व्यापाऱ्यांनी आत्महत्याही केल्या आहेत. मात्र, काही व्यापाऱ्यांकडे अजूनही जुन्या नोटा असल्याची माहिती आपल्याकडे आहे. जर आमचं सरकार सत्तेत आलं तर आम्ही या जुन्या नोटा बदलून देऊ, असं आश्वासन प्रकाश आंबेडकर यांनी दिलंय. सरकार व्यापाऱ्यांना धमकावून भाजपचा प्रचार करण्यास भाग पाडत असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
Updated : 4 April 2019 9:42 AM GMT
Next Story