विधानसभेत युतीला २२५ जागा मिळणार ?
Max Maharashtra | 27 May 2019 4:16 PM IST
X
X
लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपानं ४८ पैकी २३ तर शिवसेनेनं १८ जागा मिळवल्या आहेत. एका लोकसभा मतदार संघात प्रत्येकी किमान ४ ते ५ विधानसभा मतदारसंघांचा विचार केला तर राज्यात आगामी विधानसभा निवडणूकीत युतीला २२५ जागांवर आघाडी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. लोकसभा मतदारसंघात अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये युतीला निर्णाय़क आघाडी मिळाल्यानं युतीच्या उमेदवारामध्ये उत्साह संचारलाय.
लोकसभा निवडणूकीनंतर अवघ्या तीन महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्य़ा आहेत. या निवडणुकीपर्यंत जनतेचा कल कायम राहून विधानसभा निवडणुकीतही युतीली सहज स्थापन करता येईल,. अशी युतीच्या नेत्यांची धारणा झालीय़. गेल्या निवडणूकी प्रमाणे यंदाही मुंबईतील सर्व जागा जिंकण्यात युतीला यश आलंय. या सहा लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदार संघातही युतीचाच बोलबाला आहे. मुंबईतील ३६ पैकी तब्बल ३१ मतदार संघात महायुतीला बहुमत मिळालं असून केवळ ५ मतदार संघात काँग्रेसला आघाडी मिळाली. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबईतही शिवसेना भाजपच्य़ा जागा वाढण्याची शक्य़ता आहे.
लोकसभेच्या ४८ जागांपैकी भाजप-शिवसेना युतीनं ४१ जागा जिंकल्या. त्यामध्ये भाजप २३, शिवसेना १८, राष्ट्रवादी ५ तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं प्रत्येकी एक जागा जिंकलीय. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीतही शिवसेना-भाजप युतीला यांचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निकालानुसार राज्यातील विधानसभा निवडणुकीत २८८ जागांपैकी महायुतीला २२५ ,काँग्रेस-राष्ट्रवादीला ५७ आणि अपक्षांना ६ जागा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईतील ३६, जागांपैकी,भाजप-शिवसेना ३१ काँग्रेस-राष्ट्रवादी ३, समाजवादी पार्टी १ एमआयएमला १ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जातेय़. कोकणातील एकूण ३६ जागांपैकी भाजप-शिवसेनेला २७ काँग्रेस-राष्ट्रवादी आणि बहुजन विकास आघाडी ८, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला १ जागा मिळू शकते. मराठवाडयातील एकूण ४८ जागांपैकी भाजप-शिवसेना – ३७ काँग्रेस-राष्ट्रवादी -६ वंचित बहुजन आघाडी-एमआयएम – २ तर अपक्षांना १ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. विदर्भ ६० जागांपैकी भाजप-शिवसेना ४९ काँग्रेस-राष्ट्रवादी-स्वाभिमानीला ११ जागा मिळू शकतात. उत्तर महाराष्ट्रातील ३६ जागांपैकी भाजप-शिवसेना ३१ तर काँग्रेस-राष्ट्रवादीला ५ जागा मिळू शकतात. पश्चिम महाराष्ट्रात ७२ जागांपैकी भाजप-शिवसेना ४९ तर काँग्रेस-राष्ट्रवादीला २३ जागा मिळू शकतात, असे गणित सध्याच्या परिस्थीतीवरून मांडले जातेय. मात्र, लोकसभेची स्थिती आणि विधानसभेचं मतदान हे वेगळ्या पातळीवर आणि वेगळ्या मुद्द्यांवर होतं. त्यामुळं आता जरी अशी स्थिती दिसत असली तरी विधानसभेला वेगळं चित्र दिसू शकतं. विधानसभेची गणित ही मतदारसंघनिहाय बदलत अलतात. केंद्रात मजबुत सरकार या भावनेनं मतदारांनी दिलेला कौल राज्यात वेगळा असू शकतो. त्यामुळं अगदीच चित्र पालटलं नाही तरी आघाडीच्या जागा काही ठिकाणी वाढू शकतात.
Updated : 27 May 2019 4:16 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire