Home > मॅक्स रिपोर्ट > कुंभार कुटूंबियांनी उचलला पुरोगामित्वाचा विडा, पतीच्या निधनानंतर कुंकू न पुसण्याचा घेतला निर्णय

कुंभार कुटूंबियांनी उचलला पुरोगामित्वाचा विडा, पतीच्या निधनानंतर कुंकू न पुसण्याचा घेतला निर्णय

कोल्हापुरमधील हेरवाड पाठोपाठ सोलापूरमधील जुनोनी गावातील कुंभार कुटूंबियांनी पुरोगामित्वाचा विडा उचलत पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू न पुसण्याचा निर्णय घेतला आहे. याचा वेध घेणारा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी सागर गोतपगार यांचा स्पेशल रिपोर्ट...

कुंभार कुटूंबियांनी उचलला पुरोगामित्वाचा विडा, पतीच्या निधनानंतर कुंकू न पुसण्याचा घेतला निर्णय
X

कोल्हापुर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेतल्याने त्याचे साकारात्मक पडसाद राज्यात उमटण्यास सुरूवात झाली आहे. त्यातच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील जुनोनी गावातील कुंभार कुटूंबियांनी पुरोगामित्वाचा विडा उचलला आहे.

सोलापूरमधील सांगोल्याचे जूनोनी गावातील कुंभार कुटूंबियांनी पतीच्या निधनानंतर पत्नीच्या कपाळीचे कुंकू न पुसण्याचा निर्णय घेतला आहे. कुंभार कुटूंबातील सुधाकर कुंभार हे शालेय साहित्य, मातीचे गणपती, माठ बनवून त्याची विक्री करणे हा पारंपरिक व्यवसा करून आनंदाने जगत होते. मात्र त्यांच्यावर काळाने अकाली घाला घातला आणि अचानक त्यांचा मृत्यू झाला. मात्र सुधाकर कुंभार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र तसंच कपाळावरील कुंकू पुसण्याचा प्रसंग आला. त्यावेळी आम्ही आमच्या सुनेच्या कपाळावरील कुंकू आणि सौभाग्याचं लेणं मंगळसूत्र अजिबात काढणार नाही, अशी क्रांतीकारी भूमिका घेतली.

कुंभार कुटूंबियांनी घेतलेल्या निर्णयानुसार सुधाकर यांच्या पत्नीचे कुंकू पुसले नाही. याऊलट उपस्थित स्रियांनी त्यांना कुंकू लावत एका अनिष्ठ प्रथेचा मुडदा पाडला. तर हेरवाडपाठोपाठ सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यातील जूनोनी गावानेही विधवा प्रथा बंदीचा ठराव केला आहे. तर या निर्णयाचे गावातील पुरूषांसह स्रियांनीही स्वागत केले आहे.

याबरोबरच सुधाकर कुंभार यांच्या पत्नीने पतीच्या स्मती प्रित्यर्थ्य आंब्याचे झाड लावले. त्यामुळे हे झाड सुधाकर कुंभार यांच्या स्मृती जपून ठेवेलच. पण त्याबरोबरच एका कु-प्रथेला गाडून त्यावर सुधारणेचा आणि पुरोगामित्वाचा वारसा येणाऱ्या-जाणाऱ्यांना सांगत राहील, अशी प्रतिक्रीया सुधाकर कुंभार यांच्या पत्नीने दिली.

Updated : 16 Aug 2022 12:11 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top