का घेत आहे भाजप ७० ठिकाणी पत्रकार परिषदा
Max Maharashtra | 17 Dec 2018 12:05 PM IST
X
X
राफेल विमान खरेदी प्रकरणी काँग्रेसला सडेतोड उत्तर देण्यासाठी भाजप आज देशभरात ७० ठिकाणी पत्रकार परिषदा घेणार आहे. याची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांकडे सोपवण्यात आली आहे. राफेल विमान खरेदी प्रकरणी काँग्रेसने भाजपाला घेरले असून सर्वोच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यानतंर भाजपाला बळ मिळाले आहे. राफेल विमान खरेदी प्रकरणात काँग्रेसने कोंडी केलेल्या भाजपाला सर्वोच्च न्यायालयात मोठा दिलासा मिळाला आहे. त्यानंतर काँग्रेसविरोधात भाजपनेही आक्रमण धोरण स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपा तेलंगणा राज्य पक्ष कार्यालय, नामपल्ली, हैदराबादला पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मिळतेय.
Updated : 17 Dec 2018 12:05 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire