Home > मॅक्स रिपोर्ट > उत्तर भारतात राहुल गांधी का होत आहेत ट्रोल?

उत्तर भारतात राहुल गांधी का होत आहेत ट्रोल?

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दक्षिण भारतातून उत्तर भारतात दाखल झाली आहे. पण दक्षिण भारतापेक्षा उत्तर भारतात राहुल गांधी यांना ट्रोल का केलं जात आहे? राहुल गांधी यांच्या बदनामीतून भाजपला काय साध्य करायचं आहे? भारत जोडो यात्रा भाजपला का झोंबतीय? जाणून घेण्यासाठी पहा भरत मोहळकर यांचा स्पेशल रिपोर्ट

उत्तर भारतात राहुल गांधी का होत आहेत ट्रोल?
X

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबरपासून सुरु झाली. ही यात्रा तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र मार्गे मध्यप्रदेशात दाखल झाली आहे. मात्र यात्रा दक्षिण भारतात असताना राहुल गांधी यांना भाजपकडून जितक्या प्रमाणात ट्रोल केलं जात होतं. त्यापेक्षा उत्तर भारतात अधिक प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. यामध्ये राहुल गांधी यांच्यावर ते कधी मंदिरात गेल्यावरून तर कधी मशीद किंवा चर्चमध्ये गेल्यावरून टीका केली जात आहे. त्याबरोबरच राहुल गांधी यात्रेत चालत असताना अनेक महिलांना भेटतात. महिला राहुल गांधी यांच्याशी हस्तांदोलन करतात तर कधी एखादी महिला राहुल गांधी यांच्या गालावर चुंबन घेते. मात्र राहुल गांधी यांचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून राहुल गांधी यांना ट्रोल करण्याचे काम भाजपच्या आयटी सेलकडून सुरु आहे.

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत चालत असताना राजस्थानमधील महिला आमदार दिव्या यांच्या कपाळावर चुंबन घेतले. त्यावरूनही भाजप नेते अरुण यादव यांनी या फोटोला कॅप्शन सूचवा म्हणत ट्रोल केले.


राहुल गांधी यांच्या यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान दाढी वाढवली आहे. त्यावरून भाजप नेते अरुण यादव यांनी राहुल गांधी यांची तुलना थेट सद्दाम हुसेनशी केली आहे.


भारत जोडो यात्रा सुरू असताना राहुल गांधी मंदिर, मशीद आणि चर्चमध्ये गेले होते. त्यातच राहुल गांधी यांचे मशिदीतील आणि महाकाल मंदिरातील फोटो एकत्रित करून हा बदल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे झाल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांचे जुने आणि आत्ताचे फोटो एकत्रित करून ही दुतोंडी भूमिका असल्याचे म्हटले आहे.


महाकाल मंदिरात आरती करतानाचा राहुल गांधी यांचा फोटो स्मृती इराणी यांनी उलटा करून ट्वीट केला. त्यावर भाजपच्या आयटी सेलने पिशाच्चों को हमेशा उलटा लटका दिया होता है, असं म्हटलंय. त्यातच राहुल गांधी यांची तुलना थेट पिशाच्चांसोबत करण्यात आलीय. त्यामुळे राहुल गांधी यांना जास्तीत जास्त बदनाम कसं करता येईल, यासाठी भाजपची आयटी सेल कामाला लागली आहे.


राहुल गांधी यांचा माईक बंद असल्याचा व्हिडीओ ट्वीट करून राहुल गांधी यांना ट्रोल केलं होतं. यासंदर्भात भाजप नेते अरुण यादव यांचे ट्वीट पाहुया


राहुल गांधी यांच्या भाषणाचा खरा व्हिडीओ


राहुल गांधी यांनी जेव्हा दक्षिण भारतातून भारत जोडो यात्रा सुरु केली. त्यावेळी त्यांनी अनेक मंदिरं, मशीद, चर्च, गुरुद्वारा यांना भेट देत वाटचाल केली. यादरम्यान सर्वसामान्य लोकांची भेट घेतली. यामध्ये अनेक महिला आणि मुलींनी राहुल गांधी यांच्याशी कधी हस्तांदोलन तर कधी गालावर चुंबन केले. त्यावरून भाजपने ही कसली भारत जोडो अशी टीका केली. पण हे सगळं भाजपला का झोंबतंय? असा सवाल काँग्रेसकडून विचारला जात आहे.

राहुल गांधी यांना उत्तर भारतात ट्रोल करण्याची कारणं काय?

2014 च्या लोकसभा निवडणूकीपुर्वी विरोधकांनी आणि मीडियाने राहुल गांधी यांची पप्पू अशी प्रतिमा तयार केली होती. मात्र भारत जोडो यात्रेत मोठा प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे लोकांना राहुल गांधी हे पप्पू नसून ते संवेदनशील राजकारणी असल्याचे समजायला लागले आहे. त्यामुळे मीडियाने निर्माण केलेली पप्पू नावाची प्रतिमा सध्या गळून पडत आहे. त्यापार्श्वभुमीवर पप्पू नावाची प्रतिमा कायम ठेवण्यासाठी आयटी सेल राहुल गांधी यांना मोठ्या प्रमाणात बदनाम करताना दिसत आहे.

उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील लोकभावना वेगवेगळी आहे. त्यातच भाजपने उत्तर भारत हा हिंदूत्वाची प्रयोगशाळा बनवला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना बदनाम करून आणि राहुल गांधी यांची हिंदूविरोधी प्रतिमा उभी करण्याचा भाजपचा डाव आहे. त्यामुळेच उत्तर भारतात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु असताना ते हिंदूविरोधी असल्याचे ट्वीट भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहेत.

दक्षिण भारतात राहुल गांधी यांचे भाषण भाषांतरीत करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला उभा रहावं लागत होतं. मात्र आता उत्तर भारतात राहुल गांधी थेट नागरिकांशी बोलू शकतात. त्यातच महागाई, बेरोजगारी, द्वेषाचे राजकारण, शिक्षण, आरोग्य, शेतकऱ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर राहुल गांधी थेटपणे बोलत आहेत. त्यामुळे भाजपचा बुरखा फाटण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न ट्रोल आर्मीकडून सुरु आहे.

एके काळी उत्तर भारतात काँग्रेसची मोठी ताकद होती. ती ताकद समाजवादी, बसपा यांच्यानंतर भाजपने हस्तगत केली. पुन्हा उत्तर भारतात पुन्हा राहुल गांधी कमबॅक करू शकतात. त्यामुळे राहुल गांधी यांना भारत जोडोतील विविध मुद्द्यांवरून आयटी सेल बदनाम करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे समोर दिसणाऱ्या आणि अर्धवट असलेल्या गोष्टींवर विश्वास ठेऊन मत बनवण्याआधी सत्य तपासून घ्यायला हवे. त्यामुळे खोट्या बातम्या पसरवून सर्वपक्षीय नेत्यांची बदनामी थांबवता येईल.


Updated : 2022-12-01T13:26:45+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top