Home > Election 2020 > युवा नेत्यांच्या ‘त्या’ फोटोंवर आक्षेप का ?

युवा नेत्यांच्या ‘त्या’ फोटोंवर आक्षेप का ?

युवा नेत्यांच्या ‘त्या’ फोटोंवर आक्षेप का ?
X

सुशिक्षित युवकांनी राजकारणात आलं पाहिजे, असं आपण म्हणतो. आणि दुसरीकडे राजकारणातच करिअर करू पाहणाऱ्या युवकांचं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातही पुन्हा पक्ष आणि नेते पाहून टीकेचा सूर निघतो.

सोशल मीडियावर युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आणि पार्थ पवार यांचे खासगी आयुष्यातील मित्र-मैत्रिणींबरोबरच फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. आता दोघंही राजकारणात सक्रिय आहेत. हे फोटो दोघंही कॉलेजमध्ये शिकत असतांनाचे आहेत. दोघंही मोठ्या राजकीय घराण्यातील आहेत. त्यामुळं त्यांनी कॉलेजचं आय़ुष्य एन्जॉय करायचं नाही का, मोठ्या घराण्यांच्या मुलांना खासगी आयुष्य नसतं का...असे प्रश्न नेटिझन्स आता या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांना विचारू लागले आहेत.

या दोघांपैकी पार्थ पवार हे सध्या मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळं निवडणूकीच्या प्रचारात असे फोटो व्हायरल करून राजकीय नेत्यांनी तरूण नेत्यांचं मनोधैर्य खच्चीकरणाचा प्रयत्न केलाय, यावरही नेटिझन्सनी नाराजी व्यक्त केलीय.

या संदर्भात शिवसेनेच्या वतीनं हर्षल प्रधान यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली...

अशा सोशल मीडिया वरील पोस्ट वर दुर्लक्ष करायला हवे किंबहुना अशा पोस्ट वायरल करण्यापासून रोखायला हव्यात , या फोटोशॉप चा वापर करुन तयार केलेल्या पोस्ट वाटतात , राजकीय व्यक्तिनाही वैयक्तिक आयुष्य असते , त्यांच्या जुन्या कुठल्यातरी फोटोंचा गैरवापर करुन अशा पद्धतीने त्यांची प्रतिमा मलिन करणे अयोग्य आहे , राजकीय व्यक्तीमत्वांची पुढील पीढ़ी मग ती कोणत्याही पक्षातली असो त्यांच्यावर लहानपणापासूनच राजकीय संस्कार झालेले असतात त्यामुळे त्यांच्याकडून शक्यतो आपली प्रतिमा आणि त्यासोबत आपल्या कुटुंबियांची प्रतिमा मलिन होणार नाही याची काळजी घेतली जातेच तसे संस्कारच त्यांच्यावर आपसूक होतातच , आजच्या राजकीय घारण्यातल्या पुढील पिढ्या तर अतिशय हुशार आणि चाणाक्ष आहेत , त्यांच्यावर अशा पद्धतीने सोशल मीडियाद्वारे अन्याय करणे अयोग्य आहे , ज्यानी कोणी हे केले असेल त्यानी त्वरित सदर पोस्ट डिलीट कराव्यात आणि ज्यांच्याकडे त्या फॉरवर्ड झाल्या असतील त्यानी अशा पोस्ट पाठवणाऱ्याना तसे करण्यापासून रोखावे , आपण सगळेच महाराष्ट्राचे म्हणून अभिमानाने स्वतःला संबोधतो , महारष्ट्राच्या सुसंस्कृत पणाला शोभेल असेच आपण सोशल मीडियात पोस्ट करताना वा फॉरवर्ड करताना वागले पाहिजे.

युवा नेत्यांच्या सोशल मीडियावरील खासगी फोटोबाबत नेटिझन्सच्या प्रतिक्रिया

Updated : 27 April 2019 8:14 AM GMT
Next Story
Share it
Top