Home > मॅक्स रिपोर्ट > माझ्या गाडीवर हल्ला करणाऱ्यांवर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कारवाई का नाही? - खासदार हिना गावित

माझ्या गाडीवर हल्ला करणाऱ्यांवर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कारवाई का नाही? - खासदार हिना गावित

माझ्या गाडीवर हल्ला करणाऱ्यांवर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कारवाई का नाही? - खासदार हिना गावित
X

धुळे येथे काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आंदोलकांनी नंदुरबारच्या खासदार हिना गावित यांच्या गाडीवर हल्ला बोलत त्यांच्या गाडीची तोडफोड केली होती. त्याच संदर्भात बोलताना खासदार हिना गावित यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

'इतर आमदार आणि लोकप्रतिनिधी सोडून माझ्याच गाडीवर हल्ला का? माझ्या गाडीवर हल्ला करणाऱ्यावर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कारवाई का नाही?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 'माझ्यावर जो काल हल्ला झाला आहे तो मॉब लिंचिंगचा प्रकार होता, मला माझा मृत्यू समोर दिसत होता. महिला प्रतिनिधींवर असा हल्ला होणे निंदनीय आहे' असं म्हणत गावित यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Updated : 6 Aug 2018 12:09 PM GMT
Next Story
Share it
Top