Home > Election 2020 > लोकांच्या जीवनमरणाचे सारेच विषय गायब का ?- प्रा.हरी नरके

लोकांच्या जीवनमरणाचे सारेच विषय गायब का ?- प्रा.हरी नरके

लोकांच्या जीवनमरणाचे सारेच विषय गायब का ?-  प्रा.हरी नरके
X

राष्ट्रीय सुरक्षा, सर्जिकल स्ट्राईक, हिंदुत्ववादी आंतकवाद, गोरक्षा, हिंदुत्ववादी राष्ट्रवाद, पाकिस्तान एव्हढेच विषय जीवनमरणाचे असतील तर मग भारत मॉडेल, विकास, सुशासन, महागाई, काळा पैसा, गरिबी, शेती, बिजली, सडक,पाणी, आरोग्य, शिक्षण, निवारा, रोजगार यांचे काय झाले? त्यांचा कार्यपुर्ती अहवाल कोण देणार? तुमचे ५ वर्षांचे रिपोर्टकार्ड कुठेय? पंतप्रधान महोदय, तुमचे प्रगतीपुस्तक दाखवा आणि सोबत २०१९ ते २०२४ चे आपले व्हीजन काय? अजेंडा काय? हेही सांगा.

त्याच्यावर बोला ना काहीतरी...

भारताला शिव्या घालीत जगणं ही पाकीस्तानची रित आहे. तुम्ही त्याच धर्तीवर भारताला पाकीस्तानकेंद्री का बनवताय? भारताला पाकीस्तानच्या पातळीवर का नेताय? भारताच्या तुलनेत पाकीस्तान हा किरकोळ देश आहे. आपली अनेक राज्ये आकार, लोकसंख्या, अर्थव्यवस्था यादृष्टीने पाकपेक्षा मोठी आहेत. एकट्या महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्थासुद्धा पाकच्या कितीतरी मोठी आहे. तेव्हा भारताला महान करता येत नसेल तर ठिकाय. मात्र, एका छटाकभर देशाच्या बरोबरीने भारताला उभे करून भारताला निदान छोटंतरी करू नका. भारतपण जपा.

- हरी नरके

Updated : 24 April 2019 7:37 AM GMT
Next Story
Share it
Top