Home > मॅक्स रिपोर्ट > राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, काय आहे कारण?

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, काय आहे कारण?

राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. पण त्याची काय आहेत करणे? जाणून घेण्यासाठी पहा भरत मोहळकर यांचा रिपोर्ट...

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, काय आहे कारण?
X

२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटक मधील कोलार येथे बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यामध्ये राहुल गांधी म्हणाले होते की, सर्व चोरांचे नाव मोदी कसे असते. नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी अशी नावं घेतली होती.

देशात आणखी शोध घेतला तर अनेक ललित मोदी, नीरव मोदी, नरेंद्र मोदी सापडतील. यावेळी राहुल गांधी यांनी नीरव मोदी, मेहुल चोक्सी, ललित मोदी, अनिल अंबानी आणि नरेंद्र मोदी हे चोर असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरून सुरत पश्चिमचे आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यामध्ये राहुल गांधी यांच्यावर कलम ४९९ आणि ५०० (मानहानीचा खटला) खटला दाखल केला होता. याप्रकरणी राहुल गांधी तीन वेळा न्यायालयासमोर हजर राहिले. यात २०२१ मध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान मी निर्दोष असल्याचं राहुल गांधी म्हणाले होते.

काय होता आरोप?

राहुल गांधी यांनी आमच्या पूर्ण मोदी समाजाचा अपमान केल्याचा आरोप पुर्णेश मोदी यांनी केला होता. यानुसार न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर आज लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. त्यासंदर्भातील पत्र लोकसभा सचिवालयाने जारी केले. त्यानंतर देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

कोणत्या नियमानुसार राहुल गांधी यांची खासदारकी झाली रद्द?

सर्वोच्च न्यायालयाने १३ जुलै २०१३ रोजी लिली थॉमस प्रकरणात दिलेल्या निकालानुसार

Updated : 25 March 2023 10:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top