Home > मॅक्स रिपोर्ट > काँग्रेसला डिवचण्यामागे देवेंद्र फडणवीस यांची रणनीती काय?

काँग्रेसला डिवचण्यामागे देवेंद्र फडणवीस यांची रणनीती काय?

गृहमंत्र्यांवरील खंडणीखोरीच्या आरोपांवरुन देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे मौन पेड आहे का असा सवाल उपस्थित केला आहे. पण भाजपकडून सातत्याने काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न का होतो आहे, याचे विश्लेषण करणारा हा रिपोर्ट.....

काँग्रेसला डिवचण्यामागे देवेंद्र फडणवीस यांची रणनीती काय?
X

राज्य सरकारवर झालेल्या खंडणीखोरीच्या आरोपांनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी य़ा प्रकरणात काँग्रेसला टार्गेट केले आहे. काँग्रेसला या खंडणीतील किती वाटा मिळतो, असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे. पण फडणवीस यांची ही केवळ टीका नाही तर यामागे काय रणनीती आहे, याचा आढावा आपण घेणार आहोत.

फडणवीसांचा काँग्रेसला सवाल "राज्यात गेल्या काही दिवसात काही घटना बाहेर येत आहेत, पण या संपूर्ण प्रकरणात काँग्रेस पार्टी अस्तित्वहीन दिसते आहे. तसेच त्यांची भूमिकाच दिसत नाहीये. त्यांचे नेते दिल्लीत काही बोलत आहेत, इकडे काही वेगळे बोलत आहेत. केवळ सत्तेतकरीता हे काम सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसला मौन बाळगण्याचा किती वाटा मिळतोय", हे त्यांनी जाहीर करावे असे आव्हान फडणवीस यांनी दिले आहे."

देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला टार्गेट करण्यामागे कारण काय असू शकते याचा विचार केला तर काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊ शकले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांवर होत असलेल्या गंभीर आरोपांनंतरही काँग्रेसला डिवचले तर काँग्रेस सरकारमधून बाहेर पडू शकते अशी एक शक्यता फडणवीस यांना वाटत असावी. त्यामुळेच या आधीही अधिवेशनात प्रवीण दरेकर यांनी काँग्रेस नेते आणि मंत्र्यांची कामं होत नाहीत, अशी टीका करत काँग्रेसला चिमटे काढले होते.


देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला टार्गेट करण्यामागे कारण काय असू शकते याचा विचार केला तर काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊ शकले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांवर होत असलेल्या गंभीर आरोपांनंतरही काँग्रेस डिवचले तर काँग्रेस सरकारमधून बाहेर पडू शकते अशी एक शक्यता आहे. त्यामुळेच याआधीही अधिवेशनात प्रवीण दरेकर यांनी काँग्रेस नेते आणि मंत्र्यांची कामं होत नाहीत, अशी टीका करत काँग्रेसला चिमटे काढले होते.

काँग्रेसचे म्हणणे काय?



यासंदर्भात आम्ही काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली तेव्हा त्यांनी सांगितले की, " खोटे बोलणारे आणि रेटून बोलणारे, वाटेकरु कोण आहेत, हे महाराष्ट्राला माहिती आहे. स्वत:ला सत्ता न मिळाल्याने त्यांची चिडचिड सुरू आहे. रश्मी शुक्ला यांचा वापर भीमा कोरेगावमध्ये बहुजन समाजाला चिरडण्यासाठी कसा केला याची माहिती महाराष्ट्रापासून लपून राहिलेली नाही. त्यांना सरकार पडले पाहिजे, आपल्याला सत्तेवर बसता आले पाहिजे यासाठी त्यांची फडफड आणि चिडचिड दिसते. पण त्यांना महाराष्ट्राच्या अस्मितेशी आणि परंपरेशी देणेघेणे नाही" अशी टीका अतुल लोंढे यांनी केली आहे.




ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्या मते १०० कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप सिद्ध झालेला नसताना काँग्रेसला किती वाटा मिळतो असा सवाल विचारणे हा फडणवीस यांचा उर्मटपणा आहे. त्याचबरोबर काँग्रेसला अस्तित्वहीन म्हणून फडणवीस हे काँग्रेसला काहीच किंमत नाही असे दाखवून काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. याआधीही भाजपचे नेते काँग्रेसला सरकारमध्ये किंमत नाही असे म्हणत सातत्याने डिवचण्याचे काम करत असल्याचे दिसते आहे. त्याला जोड म्हणजे संजय राऊत काँग्रेसला कुरकुरणारी खाट म्हणतात, शरद पवारांनी सोनिया गांधी यांच्याऐवजी युपीएचे अध्यक्ष व्हावे अशी मागणी करतात, त्यामुळे भाजपला काँग्रेसला डिवचण्याचे मुद्देच मिळतात. त्यामुळे आता भाजपच्या आरोपांना कागदपत्रांसह उत्तर देण्याचे काम सुभाष देसाई, पृथ्वीराज चव्हाण व जयंत पाटील यांच्यासारख्या नेत्यांनीच एकत्रितरीत्या पत्रकार परिषद घेऊन केले पाहिज, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Updated : 24 March 2021 8:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top