Home > मॅक्स रिपोर्ट > शेतकरी आंदोलनात संघ कोण आहे संदीप गिड्डे ?

शेतकरी आंदोलनात संघ कोण आहे संदीप गिड्डे ?

संप - आंदोलनं आणि वाटाघाटी म्हणलं की ठराविक साचेबध्द व्यक्ती आणि संस्थांचा सहभाग दिसतो. एक नाव गेल्या काही दिवसात सातत्याने माध्यमांपुढं येतयं, ते नाव आहे संदीप गिड्डे महाराष्ट्रातला शेतकरी संप- मराठा मोर्चा ते आता दिल्लीतील आंदोलन असा प्रत्येक आंदोलनात सहभाग असलेला संदीप गिड्डे.....

शेतकरी आंदोलनात संघ कोण आहे संदीप गिड्डे ?
X

केंद्र सरकारच्या तीन कृषी सुधारणा विधेयकांविरोधात गेल्या १५ दिवसापासून दिल्लीमधे आंदोलन सुरु आहे. महाराष्ट्रातून अनेक शेतकरी आंदोलक देखील दिल्लीमध्ये दाखल झाले. राष्ट्रीय किसान महासंघाचे समन्वयक म्हणून संदीप गिड्डे सध्या दिल्लीत वावरत आहे. माध्यमांशी चर्चा आणि भुमिका मांडण्यातही ते पुढे - पुढे असतात.

संदिप गिड्डेंची ओळख भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटलांचा निकटवर्तीय म्हणून आहे. भाजपच्या सत्ताकाळात संदीप गिड्डे हे माजी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या सोबत होते. कृषी खात्यातल्या अनेक योजना आणि अनुदानाबरोबरच वेगवेगळ्या शहरात कृषी प्रदर्शन भरवल्याची माहीती आहे.

संदिप गिड्डेनं मराठा क्रांती मोर्चात हस्तक्षेप केल्यामुळे मार खाल्ल्याची चर्चाही सर्वाधिक आहे. २०१८ मध्ये झालेल्या शेतकरी संपाची मूळ कल्पना ही पुणतांब्याचे धनंजय जाधव आणि वैजापूरचे धनंजय धोराडे यांची होती. या शेतकरी संपातही संदीप गिड्डेनं अशी एन्ट्री केली होती. आंदोलन बिघडवण्यात सार्वधिक वाटा किंवा सगळाच वाटा या खलनायकाचा आहे. संपाच्या औरंगाबादच्या बैठकीनंतर शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी संपात सहभागी झाले.

याच बैठकीत आणखी एक काळाकुट्ट चेहरा यात सहभागी झाला होता त्याचं नाव संदीप गिड्डे... पुढे पुढे याच संदीप गिड्डे ने कोअर कमिटीची संकल्पना मांडली... या कोअर कमिटीतही त्याला नको असलेले लोक सहभागी झाल्याने त्याने त्याच्या पट्टीतल्या लोकांची नवी सुकाणू समिती तयार केली... त्यानंतरही गोंधळ व्हायला लागला म्हणून या पठयाने शिस्तपालन समितीही स्थापन केली.

भाजपची सत्ता गेल्यानंतर सदाभाऊ खोतांची साथ सोडून संदिप गिड्डेनं शिवसेनेची वाट धरली. अधिकृतपणे गिड्डेनं शिवसेनेंत प्रवेश केला असला तरी विविध आंदोलनामधे सहभागी होऊन अजेंडा रेटायचा अशी कामं गिड्डे करत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे.

* मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत संदीप गिड्डेनं केलेला शिवसेना प्रवेश

शेतकरी संपामधे संदिप गिड्डेची भुमिका वादग्रस्त होती. आता दिल्लीच्या आंदोलनातही तो आघाडीवर दिसतो. प्रत्यक्षा प्रसारमाध्यमांशी गिड्डे बोलत असला तरी दिल्ली आंदोलनाच्या निर्णय प्रक्रीयेत आणि वाटाघाटीत स्थान नसल्याचे सांगितले. सदाभाऊ खोत यांच्या मदतीने गिड्डेनं कृषी प्रदर्शनात मोठा घोळ घातला असून चौकशी झाली तर गिड्डे सोबत सदाभाऊ देखील आत जातील असे एका कृषी संघटनेच्या सदस्यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले.

संदिप गिड्डे बोलण्यात अत्यंत चतुर आहे. कृषी प्रदर्शनातून तो पैसा मिळवतो. संप- आंदोलन सुरु झाले की गिड्डेसाठी संधी असते. कोणत्याही परीस्थितीमधे तो संप आणि आंदोलनात सहभागी होऊन आपला अजेंडा रेटतो असा अनुभव आहे.

Updated : 11 Dec 2020 4:26 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top