Home > मॅक्स रिपोर्ट > कोणत्या मतदार संघातून कोणी दाखल केला उमेदवारी अर्ज?

कोणत्या मतदार संघातून कोणी दाखल केला उमेदवारी अर्ज?

कोणत्या मतदार संघातून कोणी दाखल केला उमेदवारी अर्ज?
X

लोकसभा निवडणुकीसाठी आज जवळपास सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे आजपासून खऱ्या अर्थाने उमेदवार प्रचाराला लागले आहेत. ज्या मतदार संघात 11 एप्रिल आणि 18 एप्रिल अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. अशा मतदार संघासाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे पहिल्या दोन टप्प्यातील मतदार संघातील देशभरातील उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले. त्यातच गेल्या काही दिवसात सर्वच राजकीय पक्षामध्ये उमेदवारीवरुन नाराजी पाहायला मिळत आहे. त्यामुळं पक्षांतर सुरु असल्यानं कोणत्या उमेदवाराचं कधी तिकीट कापलं जाईल या भीतीनं उमेदवारांवर सतत टांगती तलवार होती. मात्र, आज फायनल अर्ज भरला गेल्यानं पक्षाचे अधिकृत उमेदवारांनी एक लढाई जिंकली खरी. मात्र, खऱ्या लढाईला आज पासून राजकीय मैदानात सुरुवात झाली आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्वच उमेदवारांनी शक्ती प्रदर्शनाबरोबरच देवाची पूजा करत भक्ती प्रदर्शनही केले.

प्रितम मुंडेचा अर्ज दाखल

महायुतीच्या बीडच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांनी शक्तीप्रदर्शना भक्ती प्रदर्शन करत आज ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंसह सहकुटुंब श्री वैद्यनाथांचं दर्शन घेतलं, त्यानंतर पांगरी येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, यांच्यासह मुंडे कुटुंबीयांची उपस्थिती होती. यावेळी प्रितम मुंडे यांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला.

बजरंग सोनवणे यांचा अर्ज दाखल

आज बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळेस धनंजय मुंडे यांनी शक्ती प्रदर्शन करत मोठ्या जल्लोषात आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी अर्ज दाखल केला. य़ावेळी बीडमध्ये ‘बजरंगाचे वारे! आहे असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं असून सत्ताधारी सभा नाकारू शकतात पण सामान्य माणसाचा आवाज दाबू शकत नाहीत.

परिवर्तन होणार त्याचा हा प्रचंड जनसमुदाय साक्षीदार आहे. सभा झाली असती तर ती रेकॉर्ड ब्रेक ठरली असती. सत्ताधाऱ्यांनी भीती पोटी सभेला परवानगी नाकाराण्याचे पाप केले. तरी आता सामान्य शेतकऱ्याचं पोरच खासदार होणार. असं ट्विट केलं आहे.

नागपुरातून गडकरींचे जोरदार शक्तिप्रदर्शन

नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बानवकुळे उपस्थित होते. भव्य रॅली काढून गडकरींनी आज शक्तीप्रदर्शन केले. गडकरींच्या या शक्तिप्रदर्शन रॅलीसाठी खास इसुझू गाडीचा एक रथ तयार करण्यात आला आहे. या रथातून गडकरींनी मिरवणूक काढत अर्ज दाखल करण्यासाठी कूच केली. गडकरींच्या सौभाग्यवतींनी गडकरी, मुख्यमंत्री आणि उर्जामंत्री यांचं औक्षण केलं. त्यानंतर गडकरींनी घरातल्या देव्हाऱ्यातल्या रेणुका मातेचं दर्शन घेतलं.

घरातून निघाल्यावर कार्यकर्त्यांसह गडकरी संविधान चौकात दाखल झाले. संविधान चौकात गडकरींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर सुरू झाली शक्तिप्रदर्शन करणारी रथयात्रा काढली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी खास नियोजीत केलेल्या रथातून भाषण केली. आणि त्यानंतर नेते आणि कार्यकर्त्यांसह गडकरींनी अर्ज दाखल केला.

तर दुसरीकडे नागपूर मधून भाजपला राम राम ठोकत स्वगृही परतलेले नाना पटोले यांनी अर्ज कॉंग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. यावेळी नागपूर कॉंग्रेसचे अध्यक्ष विलास ठाकरे, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेवार, डॉ. नितिन राऊत, आमदार सुनिल केदार, कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोँढे, अभिजीत वंजारी, अनिस अहमद उपस्थित होते.

अशोक चव्हाणांचा कोणताही गाजावाजा न करता अर्ज दाखल

नांदेड लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास नाखुष असलेले माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांनी उमेदवारी आज अखरे अर्ज दाखल केला. अशोक चव्हाणांच्या अर्ज आज शांततेत भरला असला तरी अशोक चव्हाण यांच्या अर्जाची आज राज्यभर चर्चा होती.

कुठलेही शक्तीप्रदर्शन न करता चव्हाण यांनी मोजक्या नेत्यांसह जाऊन अर्ज दाखल केला. अशोक चव्हाण हे पत्नी आमदार अमीता चव्हाण यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. मात्र पक्ष श्रेष्ठींकडून अशोक चव्हाण यांचेच नाव जाहीर केल्याने अखेर चव्हाणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अशोक चव्हाण यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आमदार अमीता चव्हाण यांनी देखील डमी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

गडचिरोलीतून भाजपचे उमेदवार अशोक नेतेंनी अर्ज दाखल केला. यावेळी हजारोंच्या संख्येने भाजपचे भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

सोलापुरात आज कॉंग्रेस नेते सुशिल कुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी अर्ज दाखल केला.

सुशिल कुमार शिंदे यांनी अर्ज दाखल करताना कॉंग्रेसचे कार्यकर्ते यांच्या सह आमदार प्रणिती शिंदे आणि कॉंग्रेसचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.

तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी मोठी रॅली काढत वंचित बहुजन आघाडीचे शक्ती प्रदर्शन दाखवले. गर्दी असल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना मोटारसायकल वर अर्ज भरण्यासाठी जावं लागल्याची आज सोलापूरात चांगलीच चर्चा होती.

यवतमाळमध्ये कॉंग्रेसकडून आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरें, भाजप शिवसेना युतीच्या उमेदवार भावना गवळी यांच्यासह प्रहारच्या वैशाली येडे आणि भाजप नेते पी. बी. आडे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. एकंदरीत यवतमाळमध्ये आज दिवसभरात चार जणांनी अर्ज दाखल केला असून भाजपचे बंडखोर नेते पी. बी. आडे यांच्या अर्जाची आज यवतमाळ मध्ये चांगलीच चर्चा होती.

अमरावतीत खासदार आनंदराव आडसूळ यांनी भरला उमेदवारी अर्ज

अमरावती लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार खासदार आनंदराव अडसूळ यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, पालकमंत्री प्रविण पोटे व भाजप-शिवसेना लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला.

आज या दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून आज खऱ्या अर्थाने निवडणुकीला सुरुवात झाली आहे.

Updated : 25 March 2019 2:26 PM GMT
Next Story
Share it
Top