Home > मॅक्स रिपोर्ट > मूल दत्तक घेण्यासाठी कोणते कागदपत्रं लागतात ?

मूल दत्तक घेण्यासाठी कोणते कागदपत्रं लागतात ?

तुम्हाला मूल दत्तक घ्यायची इच्छा असेल पण तुम्हाला त्यासाठी नेमके कोणते कागदपत्रं लागतात हे माहिती नसेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. वाचा आणि शेअर करा...

मूल दत्तक घेण्यासाठी कोणते कागदपत्रं लागतात ?
X

मूल दत्तक घेण्यासाठी सामान्य भारतीय नागरिकाला आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. ही कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत

दत्तक घेण्यासाठी प्रेरणा पत्र (Motivation letter) - दत्तक घेण्याच्या कारणांचे वर्णन करणारे (Reasons for adoption)

पालकांचे पासपोर्ट आकाराचे फोटो (Passport Photo of each parent).

कौटुंबिक छायाचित्र (Family Photograph)

दोघांचा जन्म दाखला (Birth Certificate).

फोटो ओळखपत्र (Photo identity proof) मतदार कार्ड (Voter card) / पॅन कार्ड (PAN card) / पासपोर्ट (Passport) / ड्रायव्हिंग लायसन्स (Driving license)

पत्ता पुराव्यासाठी (Address proof) मतदार ओळखपत्र (Voter card), ड्रायव्हिंग लायसन्स (Driving licencse), पासपोर्ट (Passport), आधार कार्ड (Aaadhar card), टेलिफोन बिल (Telephone bill) इत्यादी सादर केले जाऊ शकतात.

विवाहित जोडप्यासाठी विवाह प्रमाणपत्र (Marriage certificate).

घटस्फोटितांसाठी घटस्फोटाची कागदपत्रे (Divorce papers).

पती-पत्नीपैकी कोणाचा मृत्यू झाला असेल, तर त्याचं प्रमाणपत्र (Death certificate)

पालकांचा उत्पन्नाचा पुरावा / वार्षिक इंन्कम टॅक्सची प्रमाणित प्रत (Income Certificate, Income Tax Return)

पालकांचे आरोग्य / वैद्यकीय प्रमाणपत्र (Health/Medical certificate)

कुटुंबाला चांगले ओळखणाऱ्या परंतु जवळचे नातेवाईक नसलेल्या दोन व्यक्तींचे शिफारस पत्र (Recommendation Letter).

संभाव्य पालकांचे कोणतेही मूल 5 वर्षांपेक्षा जास्त वयाचे असल्यास, त्यांची संमती देखील आवश्यक आहे (Acceptance letter).

दत्तक घेणारा अविवाहित असल्यास, अपघात किंवा अकाली मृत्यू झाल्यास मुलाची काळजी घेण्यासाठी नातेवाईकाची अधिकृत संमती (Undertaking on Stamp paper)

कागदपत्रांची खातरजमा (Scrutiny) आणि तपासानंतरच (investigation) प्रकरण पुढे सरकते.

Updated : 27 Aug 2023 6:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top