Home > मॅक्स रिपोर्ट > Reservation : आरक्षणाच झालं काय ! भाट आणि महावत समाजापर्यं आलंच न्हाय

Reservation : आरक्षणाच झालं काय ! भाट आणि महावत समाजापर्यं आलंच न्हाय

Reservation : आरक्षणाच झालं काय ! भाट आणि महावत समाजापर्यं आलंच न्हाय | What happened to the reservation? Bhat and Mahavat society did not come reservation

Reservation : आरक्षणाच झालं काय ! भाट आणि महावत समाजापर्यं आलंच न्हाय
X

शिक्षण, आरोग्य, सोयी सुविधापासुन वंचित असणाऱ्या व शेतजमीन,सामाजिक दर्जा,आर्थिक मागासलेल्या जनसमुदायासाठी भारतीय राज्य घटनेत आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.परंतू स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर ही देशातील अनेक समाजांपर्यंत आरक्षण म्हणजे काय ? ते कसं मिळतं ? हे देखील माहित नाही. देश महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे परंतू अजूनही समाजातील असंख्य समुदायाला मुख्य प्रवाहाचा स्पर्शच झाला नाही. असे कितीतरी भटके विमित्त, समुदाय, जाती आजही आरक्षण व शासनाच्या सोयीसुविधा पासून दुर्लक्षित आहेत.

राज्यात आरक्षणाचा आगडोंब ?

राज्यात मराठा, OBC, धनगर या विविध समाजाच्या आरक्षणाच आगडोंब पेटलं असताना ज्यांना खरच आरक्षणाची गरज आहे. अशा कित्येक जाती समुदायातील लोकांपर्यंत स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीतही अद्याप आरक्षणाची माहीती देखील पोहचली नाही आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड महाराष्ट्र या राज्यात वर्षानुवर्षे समाजाच्या जुन्या चालीरीतीत व मुख्य प्रवाहापासून दूर खितपत पडलेला भाट आणि महावत समाज त्यातील एक आहे.

भाट आणि महावत समाजाला आरक्षण म्हणजे काय हे माहित नाही ?

राजा महाराजांच्या कालावधीत महावत समाज जोकी मुळातच जंगलात राहणारा वाघ, हत्ती,अस्वल या प्राण्यांचे हावभाव व आकलन समजणारा म्हणून राजांचे हत्ती सांभाळण्याचे त्यांचे भरन पोषण करण्याचे व चालवण्याचे काम करायचा. तर भाट समाज वेगवेगळ्या देवी देवतांच्या वेशभूषा करून भिक्षाटन करून उदरनिर्वाह करत असे, पण राजपाट संपला आणि या समाजावर आता अक्षरशः भीक मागण्याची वेळ आलीय.कारण उदरनिर्वाह करण्यासाठी भाट व महावत समाजाला आता चटई विकून,भीक मागून आपल्या मुलाबाळांचे पोट भरण्याची वेळ आलीय.

आरक्षणापासून कोसो दूर..

हा समाज आता आरक्षण व शिक्षण तर सोडा पण एकवेळचा कोरकूटका मुलांना मिळावा यासाठी या राज्यातून त्या राज्यात भटकंती करतोय.आणि निवाऱ्यासाठी शहरातील गलिच्छ,अस्वच्छ असणाऱ्या पुलांखाली कुटुंबासह वास्तव्य करतोय.अशा कित्येक मुख्य प्रवाहापासून कोसो दूर असलेल्या महावत व भाट समाजा सारख्या समाजाना,आरक्षण तर सोडाच,पण त्यांना सोयीसुविधाही माहीत नाही व शिक्षणही माहीत नाही, त्यांना कधी मिळेल न्याय हा प्रश्न मात्र अद्याप तरी अनुत्तरितच आहे.

Updated : 9 Jan 2024 2:09 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top